Rohit Sharma : रोहितची 38 व्या वर्षी पहिल्या स्थानी झेप, शुबमनला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Rohit Sharma Icc Odi Batting Ranking : रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर विश्व विक्रमाला गावसणी घातली आहे. रोहितने विद्यमान कर्णधार शुबमन गिल याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. रोहितने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये कडक कामगिरी केली. रोहित दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांत सामनावीर ठरला. रोहितने दुसर्या सामन्यात 73 धावा केल्या. तर रोहितने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलं होतं. रोहितने नाबाद 121 धावांची खेळी केली होती. रोहितला या कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने जारी केलेल्या वनडे रँकिंगमध्ये रोहितने इतिहास घडवला आहे.
रोहितची पहिल्या स्थानी झेप
रोहित आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बॅट्समन ठरला आहे. रोहितने भारताचा एकदिवसीय कर्णधार शुबमन गिल याला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच रोहितने वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज होणारा सर्वात वयस्कर फलंदाज हा बहुमान मिळवला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, रोहित 781 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर रोहितमुळे शुबमनची तिसर्या तर अफगाणिस्तानच्या इब्राहीम झाद्रान याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
रोहितची स्फोटक फलंदाजी
रोहितला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र रोहित आऊट झाला. मात्र रोहितने शेवटच्या 2 सामन्यांमध्ये सर्व भरपाई केली. भारताला दुसऱ्या सामन्यात जिंकता आलं नाही. मात्र रोहितने अर्धशतकी खेळी करत चाहत्यांची मनं जिंकली. तर रोहितने तिसऱ्या सामन्यात शतक करुन कांगारुंच्या गोलंदाजांची पिसं काढली. रोहितने या 3 सामन्यांच्या मालिकेत एकूण 202 धावा केल्या. रोहित या मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला. रोहित यासह रँकिंगमधील नंबर 1 फलंदाज ठरला. रोहितची ही करियर बेस्ट कामगिरी ठरली. रोहितची वनडे कारकीर्दीत नंबर 1 होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
तसेच रोहितने या कामगिरीसह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. रोहित 1 नंबर फलंदाज होणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला. रोहितने वयाच्या 38 वर्ष आणि 182 दिवशी ही कामगिरी केली.
रोहितची 1 नंबर कामगिरी
World No.1 for the first time 👏
Rohit Sharma reaches the pinnacle of the ICC Men’s ODI Batting Rankings 🔝
More ▶️ https://t.co/4IgBu2txdo pic.twitter.com/am8Oms4IAa
— ICC (@ICC) October 29, 2025
रोहित पाचवा भारतीय फंलदाज
दरम्यान रोहित वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 होणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ठरणारा पहिला फलंदाज ठरला होता. सचिननंतर धोनीने ही कामगिरी करुन दाखवली होती. विराटने दीर्घकाळ अव्वल स्थान कायम राखलं होतं. विराटनंतर शुबमन गिल याने पहिल्या स्थानी मजल मारली होती. तर आता रोहितने शुबमनला पछाडत अव्वल स्थान काबिज केलं आहे.
