Team India : रोहित शर्मा कॅप्टन झाल्यावर ‘या’ खेळाडूचा टीममधून पत्ता कट, शिखरनंतर कधीही घेऊ शकतो निवृत्ती!
टीम इंडियाच्या कॅप्टनपदी रोहित शर्मा याची निवड झाल्यावर एका खेळाडू परत टीममध्ये कधीच दिसला नाही. 2010 मध्ये डेब्यू केलेला हा खेळाडू आता कधीही निवृत्ती घेऊ शकतो. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू शिखर धवन याने 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीची घोषणा केली होती. 2022 साली टीम इंडियाकडून शिखर याने शेवटचा सामना खेळला होता. आता त्याला टीममध्ये जागा मिळणं अवघड होतं. अखेर त्याने जास्त वाट न पाहता थेट निवृत्तीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जो कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. हा खेळाडू कोण आहे जाणून घ्या.
रोहित शर्मा याच्याकडे टीमच्या कॅप्टन्सीची सूत्रे गेल्यावर या खेळाडूची टीममध्ये काही निवड झाली नाही. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने त्याला टीममधून वगळलं होतं. 2021 साली या खेळाडूने अखेरचा सामना खेळला होता. आतापर्यंत त्याला टीम इंडियाच्या कोणत्याही टीममध्ये स्थान मिळत नाहीये. त्यामुळे हा खेळाडू केव्हाही क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून 39 वर्षीय वृद्धिमान साहा आहे. साहासाठी टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करणं अवघड आहे. साहाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खूप कमी संधी मिळाल्या आहेत. टीम इंडियाकडून साहाने 40 कसोटी आणि 9 वन डे सामने खेळले आहेत. 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
वृद्धिमान साहा याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2021 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध साहा याने शेवटचा वन डे सामना खेळला होता. आपल्या करियरमधील 40 कसोटी सामन्यात 29.41 च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वन डे वर्ल् कप फायनल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र दोन्ही फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता. मात्र टी-20 वर्ल्ड कप भारताने जिंकत इतिहास रचला होता. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रोहितकडे वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर टी-20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव याच्याकडे दिले गेले आहे.
