Video: रोहित शर्माने डान्स करत अनोळखी वेडिंग शूट केलं संस्मरणीय, नवरी शेवटी म्हणाली…
रोहित शर्माने कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर आता फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. यासाठी मुंबईत सराव करत आहे. या दरम्यान, त्याने एक अनोळखी वेडिंग शूटमध्ये डान्स करून ते खास केलं.

अश्विन महिन्यातील एकादशीला तुळशी विवाह पार पडला की लग्नाचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे प्री वेडिंग शूट सुरु झालं आहे. चांगल्या स्पॉटवर व्हिडीओ आणि फोटोग्राफी करण्याची लगबग सुरु झाली आहे. मुंबईतील एका जोडप्याने एक प्री वेडिंग शूट केलं. यावेळी या आनंदाच्या क्षणात सहभागी होण्यापासून रोहित शर्मा स्वत:ला रोखू शकला नाही. रोहित शर्मा सध्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तयारी करत आहे. यासाठी मुंबईत सराव करत आहे. या दरम्यान, जिमखाना परिसरात त्याने एका जोडप्याला प्री वेडिंग शूट करताना पाहीलं. प्री वेडिंग शूट सुरु असताना रोहित शर्मा खिडकीत स्पीकर घेऊन आला. यावेळी त्याने स्पीकरवर ‘आज मेरे यार की शादी है’ हे लावलं आणि ठेका धरला. रोहित शर्मा आपल्यासाठी खिडकीत नाचतोय हे पाहताच त्या जोडप्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्माने हे गाणं स्वत: स्पीकरवर लावल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे.
रोहित शर्मा खिडकीत नाचत होता तेव्हा जोडपं त्याच्याकडे पाहात होतं. नवऱ्याला तर आश्चर्याचा धक्का बसला. त्याने हात जोडून रोहित शर्माचे आभार मानले. व्हिडीओत रेकॉर्ड झालेल्या आवाजानुसार, मुलीने तर होणाऱ्या नवऱ्या मुलाला सांगितलं की हा तर आपल्या आयुष्यातील मोठा क्षण ठरला. रोहित शर्माच्या या बिंधास्त अंदाजामुळे लग्नाचे फोटोशूत संस्मरणीय ठरले. इतकंच काय तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहे. तसेच व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
A newly engaged couple was doing their wedding shoot, and when Rohit saw them while working out, he played the song “Aaj Mere Yaar Ki Shaadi Hai” on his speaker and started dancing.😃🫡
The way Couple said “ye to moment ho Gaya” 🥹
bRO made their wedding more special❤️ pic.twitter.com/E8TefTYAv9
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 10, 2025
रोहित शर्मा वनडे मालिकेच्या तयारीत
दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही असतील. 30 नोव्हेंबर रोजी पहिला वनडे सामना रांचीत खेळवला जाईल. दुसरा वनडे सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर आणि तिसरा वनडे सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
