AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

वेस्ट इंडिज कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली आहे. पण रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. असं का केलं त्या मागचा खुलासा आता झाला आहे.

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासाImage Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2025 | 4:40 PM
Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात वनडे संघाचं कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. संघात रोहित शर्मा असूनही कर्णधारपदाची माळ शुबमन गिलच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर आता शुबमन गिलच्या हाती संघाची सूत्र असणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणार आहेत. पण शुबमन गिलकडे सूत्र सोपवल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारला जात आहे. शुबमन गिलकडे वनडे संघाची धुरा सोपवताना टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं होतं की, तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार निवडणं शक्य नाही. पण आता टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.

रोहित शर्मा आपल्या मर्जीने संघाची धुरा सांभाळणं निवडकर्त्यांना आवडलं नाही, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे. संघातील वातावरण यामुळे खराब होऊ शकते अशी भिती निवडकर्त्यांना वाटत होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू ड्रेसिंग रुम आपल्या पद्धतीने चालवू इच्छित असेल, त्याचा संघाच्या खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इतकंच काय तर रिपोर्टमध्ये पुढे खुलासा केला की, गौतम गंभीरची नव्या प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर त्याने सुरुवातीचे सहा महिने मागे राहून काम केलं. तसेच जास्त हस्तक्षेप केला नाही. पण रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी गमावल्यानंतर गौतम गंभीर सक्रिय झाले. त्यांनी संघातील प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील कामगिरीवर रोहित शर्माचं पुढचं भविष्य ठरणार आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. कदाचित रोहित शर्माच्या कारकि‍र्दीची शेवटची मालिकाही ठरू शकते. काही क्रीडातज्ज्ञांच्या मते रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप खेळू इच्छित आहे. पण त्याला फॉर्म आणि फिटनेस कायम ठेवावं लागणार आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...