रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होणार? जाहीर कार्यक्रमात जय शाह यांच्या त्या सूचक वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
Rohit Sharma Team India Jay Shah: क्रिकेट जगतात एक अनोखी घटना घडली आहे. ICC चे चेअरमन जय शाह यांनी भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रोहित शर्मा याला कर्णधार म्हटले. एका कार्यक्रमात जाहिररित्या त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामागे काही संकेत आहेत का असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

Rohit Sharma Team India Jay Shah: आयसीसीचे चेअरमन जय शाह यांचे भारतीय ऑलराऊंडर रोहित शर्मा याच्याविषयी एक वक्तव्य केले. ते सध्या तुफान व्हायरल झालं आहे. दोन्ही एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी या कार्यक्रमात जय शाह यांनी रोहित शर्मा याला भारतीय टीमचा कर्णधार असं संबोधलं. यावर रोहितच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. या कार्यक्रमात नेमकं काय झालं?
रोहित शर्मा सध्या वनडेमध्ये सक्रिय
रोहित शर्मा सध्या केवळ एकदिवशीय सामन्यात सक्रिय आहे. त्याने टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून अगोदरच संन्यास घेतला आहे. त्याच्याकडे भारतीय एकदिवशीय संघाचे कर्णधारपद सुद्धा नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान रोहित शर्मा याच्या खाद्यावर वनडेचे कर्णधार पद सोपविण्यात आले नव्हते. त्याच्याऐवजी शुभमन गिल याला ही भूमिका देण्यात आली होती. तर रोहित शर्मान ने दक्षिण आफ्रिकाविरोधात एकदिवशीय सामन्याच्या मालिकेत सहभाग घेतला होता. आता त्याचे लक्ष्य हे 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडमध्ये सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेकडे आहे. या सामन्यात तो पुन्हा त्याच्या फलंदाजीची चुणूक दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले जय शाह?
एका कार्यक्रमादरम्यान जय शाह यांनी रोहित शर्मा याला भर कार्यक्रमात भारतीय संघाचा कर्णधार असे संबोधित केले. जय शाह म्हणाले की रोहित शर्मा याला कर्णधारच म्हणावे लागेल. कारण त्याच्या नेतृत्वात भारताने दोनदा ICC किताब पटकावला आहे. जय शाह यांनी 2023 विश्व चषकाची आठवण केली. त्यावेळी टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण त्यावेळी ट्रॉफी काही भारताच्या हाती लागली नाही. पण भारतीय संघाने सर्वांची मनं जिंकली होती.
जय शाह यांनी फेब्रुवारी 2024 मधील राजकोट येथील सामन्याचा पण उल्लेख केला. भारताने केवळ मनंच जिंकली नाहीत तर दमदार खेळी खेळली असं ते म्हणाले. त्यानंतर रोहित शर्मा, कर्णधार असताना भारताने 2024 टी20 विश्वचषक आणि 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. रोहित दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या भारताच्या निवडक कर्णधारांपैकी एक ठरले.
Jay Shah 🗣️: “our captain Rohit Sharma is sitting here. I am still calling you captain because under you, we won two ICC trophies”.
Jay Shah is grateful to Rohit Sharma for ending the drought of ICC trophies for India 🥹🇮🇳pic.twitter.com/7xjVZdjkwQ
— Kusha Sharma (@Kushacritic) January 8, 2026
2027 विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य
रोहित शर्मा याचे लक्ष आता दक्षिण अफ्रिकेत 2027 मध्ये होणार्या एकदिवशीय विश्वचषकाकडे लागले आहे.रोहित सध्या फिटनेस आणि त्याच्या कामगिरीवर काम करत आहे. भारतीय व्यवस्थापन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना एक वर्षानंतर होणाऱ्या या विश्वचषकात सहभागी न करुन घेण्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे हे दोघं खेळाडू खेळतील की नाही हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.
