Ruturaj Gaikwad: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची तुफानी बॅटिंग, एका ओव्हरमध्ये थेट 7 SIX

महाराष्ट्राच्या या गुणी फलंदाजाने एका चांगल्या टीमच्या बॉलर्सना कसं धुतलय? किती चौकार-षटकारांचा पाऊस पाडला, ते जाणून घ्या

Ruturaj Gaikwad: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची तुफानी बॅटिंग, एका ओव्हरमध्ये थेट 7 SIX
Ruturaj-GaikwadImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 1:44 PM

मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि महाराष्ट्राचा गुणी फलंदाज ऋतुराज गायकवाडने आज कमाल केली. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने तुफान बॅटिंग केली. महाराष्ट्राचा कॅप्टन असलेल्या ऋतुराजने उत्तर प्रदेश विरुद्ध डबल सेंच्युरी झळकावली. ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए मॅचमध्ये पहिल्यांदा डबल सेंच्युरी झळकावली.

फक्त फोर, सिक्सने केल्या इतक्या धावा?

ऋतुराज गायकवाडने आपल्या पहिल्या डबल सेंच्युरीमध्ये 16 सिक्स आणि 10 फोर मारले. म्हणजे या गुणवान फलंदाजाने फक्त फोर, सिक्सने 136 धावा चोपून काढल्या. ऋतुराज गायकवाडने आज समोरच्या उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला.

एका ओव्हरमध्ये किती धावा लुटल्या?

ऋतुराज गायकवाडने द्विशतक झळकावताना सर्वांनाच थक्क करुन सोडलं. 49 व्या ओव्हरमध्ये त्याने सलग 7 षटकार मारले. एका ओव्हरमध्ये त्याने 42 धावा लुटल्या. ओव्हरमध्ये एक नो बॉल चेंडू होता. त्यावर सुद्धा त्याने सिक्स मारला.

49 वी ओव्हर कोणी टाकली?

उत्तर प्रदेशकडून शिवा सिंहने 49 वी ओव्हर टाकली. त्याच्या पहिल्या चार चेंडूवर गायकवाडने सिक्स मारले. त्यानंतर शिवा सिंहने पाचवा चेंडू नो बॉल टाकला. त्यावर सुद्धा गायकवाडने सिक्स मारला. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सिक्स मारला. गायकवाडने एक ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा कारनामा केला.

याआधी हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता?

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारले. दुसऱ्याबाजूला शिवा सिंहने एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 43 धावा दिल्या. याआधी जेम्स फुलरच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ज्याने एका ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या होत्या.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.