AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs PAK: कगिसो रबाडाचा धमाका, पाकिस्तानविरुद्ध खास ‘अर्धशतक’

Kagiso Rabada Record : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जाणून घ्या.

SA vs PAK: कगिसो रबाडाचा धमाका, पाकिस्तानविरुद्ध खास 'अर्धशतक'
South Africa Kagiso RabadaImage Credit source: Icc X account
| Updated on: Jan 06, 2025 | 11:13 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने न्यूलँडस केपटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पाकिस्तानला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने सामन्यातील तिसऱ्या डावात मोठा कारनामा केला. कगिसो रबाडाचा यासह दक्षिण आफ्रिकेच्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला. कगिसो रबाडाने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.

कगिसो रबाडाने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील तिसऱ्या डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने दुसरी विकेट घेतली आणि खास विक्रम आपल्या नावे केला. रबाडा न्यूलँड्समध्ये 50 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज ठरला. न्यूलँड्समध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी गोलंदाज डेल स्टेन याच्या नावावर आहे. डेल स्टेन याने 74 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी मखाया एंटिनीच्या नावावर 53 विकेट्स आहेत. फिलेंडरने 53 तर शॉन पॉलकने 51 विकेट्स मिळवल्या आहेत. रबाडाने या डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने तिसरी विकेट घेत शॉन पॉलकच्या 51 विकेट्सची बरोबरी केली.

न्यूलँड्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज

  • डेल स्टेन : 74 विकेट्स
  • मखाया एंटीनी : 53 विकेट्स
  • वेर्नॉन फिलेंडर : 53 विकेट्स
  • शॉन पॉलक : 51 विकेट्स
  • कगिसो रबाडा : 50 विकेट्स

दक्षिण आफ्रिकेचे पंच रत्न गोलंदाज

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अब्बास

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.