Sachin Tendulkar : सचिनचा नवा अवतार, पांढरी दाढी, वाढलेले केस; सोशल मीडियावर नवीन लूक व्हायरल!

वाढलेले केस, वाढलेली पांढरी दाढी अशा लूकमध्ये भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरला फारच थोड्या लोकांनी पाहिलेलं असेल. (Sachin Tendulkar White Beard New look Goes Viral on Social Media)

Sachin Tendulkar : सचिनचा नवा अवतार, पांढरी दाढी, वाढलेले केस; सोशल मीडियावर नवीन लूक व्हायरल!
सचिन तेंडुलकरचा नवीन लुक...

मुंबई :  वाढलेले केस, वाढलेली पांढरी दाढी अशा लूकमध्ये भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) फारच थोड्या लोकांनी पाहिलेलं असेल. कुरळे केस आणि क्लिन शेव्हमध्ये सचिनला पाहण्याची क्रिकेट रसिकांना सवय झालीय. कोरोनाच्या काळात सचिनचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनच्या याच नव्या लूकची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतीय. सचिनच्या नव्या लूकसंबंधी सोशल मीडियावर लोक कमेंट करत आहेत. (Sachin Tendulkar White Beard New look Goes Viral on Social Media)

सचिनचा नवा लूक व्हायरल

वाढलेली दाढी आणि वाढलेल्या केसांमध्ये सचिनला फारच थोड्या लोकांनी याअगोदर कधी पाहिलं असेल. सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने सगळेण घरीच आहे. सचिनही घरी आहे. कुटुंबासोबत हे दिवस सध्या तो इन्जॉय करतो. साहजिक घरातच असल्याने त्याने केस आणि दाढी वाढवलेली आहे, असे अंदाज लोक बांधत आहेत. नुकताच सचिन कोरोना आजारातून सावरला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे.

सचिनकडून वाढदिवसाला खास व्हिडीओ शेअर

कोरोनातून सावरल्यानंतर सचिनने वाढदिनी खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत. तसंच कोरोनातून सावरलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन सचिनने केलं आहे.

व्हिडीओमधून सचिनचा खास मेसेज

सचिनने व्हिडीओमध्ये म्हटलंय, “मी प्लाझ्मा दान केंद्राचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं. मी देखील आता कोरोनातून बरा झालोय. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी देखील लवकरच प्लाझ्मा दान करणार आहे. जर योग्य वेळी प्लाझ्मा मिळाल्या तर रुग्णाच्या वेदना कमी होतात आणि कोरोनातून सावरण्यासाठी त्याला बळ मिळतं, मी आपल्या सगळ्यांना पुन्हा आवाहन करतो की आपणही पात्र असाल तर प्लाझ्मा दान जरुर करावं”

(Sachin Tendulkar White Beard New look Goes Viral on Social Media)

हे ही वाचा :

CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction: धोनीची चेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की विराटची बंगळुरु ‘पंच’ मारणार?

RCB vs CSK, IPL 2021 Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

Video : ‘उडता चेतन’, हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI