AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसन की ऋषभ पंत! मुंबई इंडियन्सच्या तीन खेळाडूंचं स्थान फिक्स

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप संघाची खलबतं सुरु झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्डकप खेळणार आहे. मात्र या संघात कोण असेल आणि कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कर्णधारपद सोडलं तर इतर 14 नावांबाबत जोरदार रस्सीखेच आहे. त्यापैकी चार नावं ही फिक्स आहेत.

टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसन की ऋषभ पंत! मुंबई इंडियन्सच्या तीन खेळाडूंचं स्थान फिक्स
टी20 वर्ल्डकपसाठी पहिली पसंती कोणाला? संजू सॅमसन की ऋषभ पंत! मुंबईच्या तीन खेळाडूंचं नाव निश्चितImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2024 | 5:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केली आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. टी20 वर्ल्डकपसाठी टीम जाहीर करण्याची डेडलाईन 1 मे पर्यंत आहे. आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे आणि 1 जूनपासून टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने यासाठी आपला संघही जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आहे. त्यामुळे टीम इंडियात कोण कोण असेल याची उत्सुकता वाढली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेल्या रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव ही नावं जवळपास निश्चित आहेत. आरसीबीकडून विराट कोहलीची निवड होईल यात शंका नाही. तर इतर 11 नावांसाठी खलबतं सुरु आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याऐवजी शिवम दुबेकडे पाहिलं जात आहे. पण शिवम दुबेने आयपीएलमध्ये एकही षटक टाकलेलं नाही. त्यामुळे त्याच्या निवडीवरून बरीच चर्चा रंगलेली आहे. दुसरीकडे, विकेटकीपर बॅट्समन म्हणून एक दोन नव्हे तर चार नाव चर्चेत आहेत. त्यापैकी दोघांची नावं निवडणं खूपच कठीण जाणार आहे. इशान किशन, संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि केएल राहुल रेसमध्ये आहेत.

रिपोर्टनुसार, संजू सॅमसन टी20 वर्ल्डकपसाटी संजू सॅमसन टीम इंडियासाठी फर्स्ट चॉईस असल्याचं सांगितलं जात आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या खेळीनंतर हा दावा जवळपास पक्का झाला आहे. या सामन्यात संजू सॅमसन आणि केएल राहुल हे दोन विकेटकीपर कर्णधार आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलने 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. 158.33 च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, संजू सॅमसननेही तोडीस तोड उत्तर दिलं. संजू सॅमसनने 33 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. 215 च्या स्ट्राईक रेटसह 7 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे केएल राहुलचा डाव त्याच्यापुढे फिका पडला.

आयपीएलमध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन फॉर्मात दिसत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण असाही प्रश्न निर्माण झाला आहे. संजू सॅमससने 9 सामन्यात 385 धावा केल्या असून चौथ्या स्थानावर आहे. तर ऋषभ पंत 10 सामन्यात 371 धावा करत सहाव्या स्थानावर आहे. तसंच पाहिलं तर धावांची गती पाहता संजू सॅमसन उजवा ठरत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, इशान किशन मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून देत आहे. पण कधी बॅट चालते तर कधी नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल की नाही सांगणं कठीण आहे. निवड समिती 15 खेळाडूंच्या चमूत कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.