AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AUS Test: शाहीन शाह आफ्रिदीच्या अप्रतिम फास्ट इन-स्विंगरवर डेविड वॉर्नर LBW पहा, VIDEO

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज (Pakistan bowler) शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याच्या त्याच्या कौशल्याला तोड नाही.

PAK vs AUS Test:  शाहीन शाह आफ्रिदीच्या अप्रतिम फास्ट इन-स्विंगरवर डेविड वॉर्नर LBW पहा, VIDEO
पाकिस्तान वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी Image Credit source: AFP
| Updated on: Mar 22, 2022 | 2:27 PM
Share

लाहोर: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज (Pakistan bowler) शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याच्या त्याच्या कौशल्याला तोड नाही. लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया (Pakistna vs Australia Test) विरुद्ध सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्यादिवशी शाहीन शाह आफ्रिदीने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. चेंडू शाहीन शाह आफ्रिदीच्या हातात असताना, फलंदाज नेहमीच सर्तक असतो. कारण त्याची भेदक गोलंदाजी कधी यष्टया वाकवेल, याचा नेम नसतो. खेळपट्टी भले फलंदाजीला अनुकूल असली, तरी अशा विकेटवर शाहीन आफ्रिदीने विकेट घेऊन दाखवल्या आहेत. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा आज दबदबा आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या भेदक माऱ्याची प्रचिती आली.

शाहीन आफ्रिदीचा अप्रतिम इनस्विंगर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटीचा पहिला दिवस होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला आज शाहीन आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवली. पहिल्या डावाच्या तिसऱ्याच षटकात शाहीन आफ्रिदीने अप्रतिम इनस्विंगर टाकला. वॉर्नरने बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूचा वेगच इतका होता की, चेंडू थेट पॅडवर आदळला. आफ्रिदीने त्याला पायचीत केलं.

डेविड वॉर्नरला गुंडाळलं डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. वॉर्नर खेळपट्टिवर टिकला, तर भल्याभल्या गोलंदाजांची खैर नसते. पण याच वॉर्नरला आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीची भेदकता दाखवली. डेविड वॉर्नरने फक्त सात धावा केल्या.

त्याच षटकात शाहीनने आऊटस्विंगरवर मार्नल लाबुशेनला भोपळाही फोडू न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजाने डाव सावरला. स्मिथ आणि ख्वाजाने तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. नसीम शाहने ही भागीदारी फोडली. स्मिथने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.