AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Malik Retirement: शोएब मलिकची अखेर क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या 44 व्या वर्षी घेतला निर्णय

पाकिस्तानचा स्टार खेळाडू शोएब मलिकने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. 11व्या पर्वापूर्वी त्याने घोषणा केली आहे. पहिल्या पर्वापासून या स्पर्धेत खेळत होता.

Shoaib Malik Retirement: शोएब मलिकची अखेर क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या 44 व्या वर्षी घेतला निर्णय
शोएब मलिकची अखेर क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या 44 व्या वर्षी घेतला निर्णय Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 20, 2026 | 7:41 PM
Share

शोएब मलिकने अखेर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला पूर्णविराम लावला आहे. पुढच्या महिन्यात शोएब मलिक 44 वर्षांचा होणार आहे. तसेच पीएसएलचं 11वं पर्व असणार आहे. असं असताना शोएब मलिकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. शोएब मलिक 2016पासून पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहे. या दहा वर्षांच्या कारकि‍र्दीत चार संघाकडून खेळला आहे. कराची किंग्स आणि मुल्तान सुल्तांस या संघाचं कर्णधारपद भूषवलं. तर पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळला आहे. शोएब मलिक पहिल्या पर्वात कराची किंग्सचा कर्णधार होता. तेव्हा त्या संघाने सुमार कामगिरी केली होती. तेव्हा फक्त दोनच सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आणि रवि बोपाराकडे सोपवलं. दुसऱ्या पर्वात अष्टपैलू म्हणून खेळला. त्यानंतर 2018 मध्ये मुल्तान सु्ल्तान्सचा कर्णधारपद भूषवलं. पण येथेही पदरी निराशा पडली. संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

पाकिस्तान सुपर लीग टी20 स्पर्धेत 2020 ते 2022 या कालावधीत पेशावर जाल्मीसाठी खेळला. तर 2023 मध्ये कराची किंग्समध्ये पुन्हा आला. 2025 मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी खेळला आणि आता निवृत्तीची घोषणा काली आहे. शोएब मलिकने या स्पर्धेत एकूण 92 सामने खेळले. तसेच 2318 धावा केल्या. या दरम्याने त्याने 15 अर्धशतकं ठोकली. तसेच त्याच्या नावावर 16 विकेट आहेत.

शोएब मलिक पाकिस्तान संघासाठी दीर्घकाळ खेळला. शोएब मलिकने नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग नव्हता. शोएब मलिक 1999 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. या दरमन्यात 35 कसोटी, 287 वनडे आणि 124 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. जगभरातील वेगवेगळ्या लीग्समध्येही नशिब आजमावलं. त्याने एकूण 557 टी20 सामने खेळले. यात 35.99 च्या सरासरीने 13571 धावा केल्या. तसेच 83 टी20 शतक ठोकले. पण टी20 शतक ठोकू शकला नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.