AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कॅप्टन! शुबमनचे वाईट दिवस सुरु?

Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यर याने गेल्या काही महिन्यांमध्ये कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत. श्रेयसने काय काय केलं? पाहा आकडेवारी.

Team India : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कॅप्टन! शुबमनचे वाईट दिवस सुरु?
Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Jun 08, 2025 | 6:32 PM
Share

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर शुबमन गिलची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुबमन इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. त्यामुळे शुबमनच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर याच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. श्रेयसने नुकतंच त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं.

शुबमन गिल याने त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सला प्लेऑफपर्यंत पोहचवलं होतं. मात्र गुजरातला अंतिम फेरीपर्यंत पोहचण्यात अपयश आलं. मात्र श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी फलंदाज आणि कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली. श्रेयस कर्णधार म्हणून पंजाबला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीनंतर चाहत्यांसह बीसीसीआयचं मनं जिंकलं आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर भविष्यात भारतीय वनडे/टी 20 संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे. रोहित शर्मा वनडे तर सूर्यकुमार यादव टी 20i संघाचा कर्णधार आहे. मात्र भविष्यात बदलाच्या स्थितीत अय्यर कर्णधाराच्या शर्यतीत आहे. त्यामुळे वनडे टीमचा उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलसाठी ही चांगली बातमी नाही, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

श्रेयस अय्यर याच्यासाठी गेली 15 महिने फार खास राहिली आहेत. श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वात आयपीएल 2024 चं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर श्रेयसने मुंबईला सय्यद मुश्ताक अली 2024-2025 ट्रॉफी जिंकून दिली होती. मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर मात केली होती. तर श्रेयसने इराणी कप 2024-25 ट्रॉफीही जिंकून दिली.

श्रेयसने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या. श्रेयसने या दरम्यान 6 अर्धशतकं झळकावली. तसेच श्रेयस आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 संघांना अंतिम फेरीत पोहचवणारा पहिला कर्णधारही ठरला.

श्रेयसची वनडेतील उल्लेखनीय कामगिरी

श्रेयस अय्यर याने वनडे क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केलीय. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. श्रेयसने या विजयात निर्णायक भूमिका बजावली. श्रेयसने या स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 243 धावा केल्या. तर 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील 11 सामन्यांमध्ये 66.25 च्या सरासरीने 530 धावा केल्या. श्रेयसने या दरम्यान 2 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.