AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Shubh’man, कर्णधार गिलचं ऐतिहासिक अर्धशतक, 4 वर्षांची प्रतिक्षा संपवली, ठरला पहिलाच कॅप्टन

Shubman Gill Fifty ENG vs IND 1st Test : शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावताच इतिहास घडवला. शुबमनने 29 धावा करताच स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला.

'Shubh'man, कर्णधार गिलचं ऐतिहासिक अर्धशतक, 4 वर्षांची प्रतिक्षा संपवली, ठरला पहिलाच कॅप्टन
Shubaman Gill FiftyImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 20, 2025 | 8:38 PM
Share

टीम इंडियाचा युवा खेळाडू शुबमन गिल याने कसोटी कर्णधार म्हणून धमाकेदार सुरुवात केली आहे. शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कोसटी सामन्यातील पहिल्या दिवशी लीड्समध्ये शानदार अर्धशतक झळकावलं आहे. शुबमनने इंग्लंड विरुद्ध 56 चेंडूत 91.07 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. शुबमनने या खेळीत 8 चौकार लगावले. तसेच शुबमन कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात अर्धशतक लगावणारा पहिला युवा भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच शुबमनचं हे आशियाबाहेरील 4 वर्षांनंतरचं पहिलं कसोटी अर्धशतक ठरलं. शुबमनने याआधी 2021 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरचं अर्धशतक झळकावलं होतं.

रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याची 24 मे रोजी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून गिलसमोर टीम इंडियाला कर्णधार म्हणून चांगली सुरुवात करुन देण्याचं आव्हान होतं. शुबमन अर्धशतक ठोकून स्वत:ची छाप सोडण्यात यशस्वी ठरला. शुबमनने विराट कोहली याच्या स्थानी (चौथ्या क्रमांकावर) बॅटिंग करताना हे अर्धशतक केलं. शुबमनला गेल्या 4 वर्षांत सेना देशात अर्धशतक करता न आल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. गिलने अखेर ही प्रतिक्षा संपवलीय. शुबमनचं हे कसोटी कारकीर्दीतील एकूण आठवं तर कर्णधार म्हणून पहिलं अर्धशतक ठरलं.

शुबमनची सेना देशातील कामगिरी

शुबमनने कसोटी कारकीर्दीत सेना देशात 2021 साली ऑस्ट्रेलियात 2 अर्धशतकं झळकावली होती. शुबमनने ऐतिहासिक गाबा कसोटी विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. शुबमनने गाबा टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 91 धावांची खेळी केली होती. शुबमनची सेना देशातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. शुबमनने त्याआधी 2021 मध्ये सिडनीत अर्धशतक लगावलं होतं. शुबमनचं अशाप्रकारे लीड्समधील हे पहिलं तर सेना देशातील तिसरं अर्धशतक ठरलं.

शुबमनची इंग्लंडमधील कामगिरी

शुबमनने लीड्स टेस्टआधी इंग्लंडमध्ये 3 सामने खेळले आहेत. शुबमनने या 3 सामन्यांमधील 6 डावांत 17 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत. शुबमनची इंग्लंडमधील 28 ही सर्वोच्च धावसंख्या होती. शुबमनने याआधी 6 डावांत अनुक्रमे 28, 8, 17, 4, 13 आणि 18 अशा धावा केल्या होत्या. शुबमनने त्याच्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडमधील पहिला सामना हा 2021 साली न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. शुबमनचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल हा इंग्लंडमधील पहिला सामना होता.

दुसरं सत्र भारताच्या नावावर

दरम्यान टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरं सत्र आपल्या नावावर केलं आहे. टीम इंडियाने 51 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 215 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन ही जोडी नाबाद परतली आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 123 धावांची नाबाद भागीदारी परतली आहे. यशस्वी 100 आणि शुबमन 58 रन्सवर नॉट आऊट आहेत. तर केएल राहुल याने 42 रन्स केल्या. तर डेब्यूटंट साई सुदर्शन याला भोपळाही फोडता आला नाही.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.