शुबमन गिलला कर्णधारपदाचा भार पेलवेना! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी वाईट बातमी
शुबमन गिलचे स्टार गेल्या काही महिन्यांपासून फिरले आहेत, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्याला कर्णधारपदाचा भार पेलवत नाही अशीही चर्चा रंगू लागली आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना आला आहे. विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा फेल गेला.

शुबमन गिलच्या क्रिकेट आयुष्यात काहीच ठीक घडताना दिसत नाही. कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यापासून चढउतार पाहात आहे. इंग्लंडविरुद्धचा दौरा चांगला गेला. त्यानंतर वेस्ट इंडिज या दुबळ्या संघाविरुद्ध कसोटीत त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी झाली. पण त्यानंतर सर्व काही रूळावरून घसरल्याचं दिसत आहे. खासकरून शुबमन गिलच्या क्रिकेट कारकिर्दीला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. शुबमन गिलने टी20 फॉर्मेटमध्ये सुमार कामगिरी केली. मागच्या एका वर्षात त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही. त्यामुळे त्याला टी20 संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप संघातूनही डावललं आहे. उपकर्णधार असताना त्याला संघातून बाहेर केलं. दुसरीकडे, दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. पण फिट तर झाला पण फॉर्म काही गवसलेला दिसत नाही. त्याचा प्रत्यय विजय हजारे ट्रॉफीत आला.
विजय हजारे ट्रॉफीत पंजाब विरुद्ध गोवा सामन्यात शुबमन गिल मैदानात उतरला. पण गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. त्याने 12 चेंडूत फक्त 11 धावा केल्या. दोन चौकार मारत कमबॅकचे संकेत दिले. पण पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट फेकली आणि तंबूत परतला. वेगवान गोलंदाज वासुकी कौशिकने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वी त्याच्या फॉर्मची चिंता आता सतावू लागली आहे. वनडे फॉर्मेटमध्ये 20 फेब्रुवारी 2025 पासून अर्धशतक ठोकलेलं नाही. मागच्या 8 डावात शुबमन गिल फेल गेला आहे. या 8 डावात 46 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
🚨🚨Shubman Gill gone for 11 runs vs Goa
– Now Shubman Gill doesn’t have a 50+ score in white bowl since 20 Feb, 2025.
– Shubman Gill has failed in 7 ODIs, 15 T2OIs & 1 List A game consecutively.
Shreyas coming from 2 months+ injury layoff scored 82 runs off 53 balls!! pic.twitter.com/N7rNVGf2o3
— Rajiv (@Rajiv1841) January 6, 2026
शुबमन गिल आणि सूर्यकुमारची तशीच अवस्था
कर्णधार शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव या दोघांची तीच स्थिती आहे. हे दोन्ही खेळाडू टी20 आणि वनडेत एकूण 23 सामन्यात फेल झाले आहेत. दुसरीकडे, श्रेयस दोन महिन्यानंतर मैदानात परतला आहे. पण त्याने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. श्रेयस अय्यरने हिमाचलविरुद्ध 53 चेंडूत धावा केल्या. सूर्यकुमार यादव हिमाचलविरुद्धच्या सामन्यात फक्त धावा करून बाद झाला.
