SL vs RSA Live Streaming: श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत, सामना कधी आणि कुठे?
Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024 Live Match Score: श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज 3 जून रोजी सामना होणार आहे. जाणून घ्या या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिला मुख्य आणि एकूण चौथा सामना हा श्रीलंका विरुद्ध यांच्यात होणार आहे. वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मारक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची सूत्र आहेत. याआधी एकूण 3 सामने पार पडले. पहिल्या सामन्यात यूएसएने कॅनडावर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात विंडिजने पीएनजीला पराभूत केलं. तर तिसऱ्या सामन्यात नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये ओमानवर मात केली. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याकडे लागून राहिलं आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना आज सोमवारी 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.
श्रीलंका क्रिकेट टीम: वानिंदू हसरंगा (कॅप्टन), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पाथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, मथीशा पथीराना, दिलशान मदुशांका, नुवान तूषारा, सिल्वान दूशमान आणि दुनिश वेल्लालागे.
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मारक्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ओटनेल बार्टमन, ब्योर्न फॉर्च्युइन.
