AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, कोलकातामधील रुग्णालयात दाखल, सूत्रांची माहिती

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly tasted Corona) कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला देखील कोरोना संसर्ग झाला असून तो कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात दाखल झाला आहे. 

Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, कोलकातामधील रुग्णालयात दाखल, सूत्रांची माहिती
सौरव गांगुली
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 9:53 AM
Share

Sourav Ganguly  नवी दिल्ली: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly tasted Corona) कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला देखील कोरोना संसर्ग झाला असून तो कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल झाला आहे. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. सौरव गांगुलीच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन एबीपी न्यूजनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

सौरव गांगुली कोलकातामधील रुग्णालयात दाखल

सौरव गांगुली याची रात्री उशिरा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणं सौरव गांगुली रुग्णालयात दाखल झाले आहेत. सौरव गांगुली कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात दाखल झालेला आहे.

सौरव गांगुली आयसोलेशनमध्ये 

सौरव गांगुली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल  झाले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

वर्षभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना गतवर्षी ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलींना त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले होते. गांगुलींवर त्यावेळी महिनाभरात दोनअँजियोप्लास्टी करण्यात आल्या होत्या. पहिल्या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले होते. दुसऱ्या अँजियोप्लास्टी स्टेनटिंगद्वारे उपचार करण्यात आले होते. डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या धमण्यांमध्ये दोन नवे स्टेन्ट टाकण्यात आले होते, अशी माहिती वुडलँडस रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

इतर बातम्या:

Scott Boland : 4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन, स्कॉट बोलांडनं इंग्लंडचा कणा मोडला, पदार्पणात रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक कामगिरी

SA vs IND, 1st Test: टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये चिकन चेट्टीनाद, लँब चॉप्स

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.