दोन वर्षांपासून विराट ठोकू शकलेला नाही शतक, पण ‘हा’ दिग्गज 189 वनडे नंतरही लगावू शकला नाही शतक

सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं नावावर असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2019 नंतर आतापर्यंत एकही शतक ठोकलेलं नाही.

दोन वर्षांपासून विराट ठोकू शकलेला नाही शतक, पण 'हा' दिग्गज 189 वनडे नंतरही लगावू शकला नाही शतक
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:20 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावेळी सर्वांचेच लक्ष पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असेल. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं नावावर असणाऱ्या कोहलीने मागील दोन वर्षांपासून एकही शतक ठोकलेले नाही. त्यामुळे तो या मालिकेत तरी शतक ठोकतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोहलीने दोन वर्षांपासून शत ठोकले नसल्याने सर्व भारतीय त्याच्या शतकाची प्रतिक्षा करत आहेत. पण एका दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने तब्बल 189 वनडे सामने शतकाविना खेळले होते. हा खेळाडू म्हणजे महान अष्टपैलू क्रिकेटपटू शॉन पॉलॉक (Shaun Pollock) असून आज (16 जुलै) त्याचा वाढदिवस आहे.

शॉनचा जन्‍म 16 जुलै रोजी 1973 मध्ये झाला होता. त्याने इंग्‍लंड विरोधात केपटाउनमधील वनडे सामन्यात डेब्‍यू केला. सलामीच्या सामन्यातच त्याने 66 धावा ठोकत गोलंदाजीत चार विकेटही मिळवले. तो दक्षिण आफ्रीका संघाचा 400 विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीने त्याने संघाला दमदार योगदान दिले. पण कर्णधारपद योग्यरित्या भूषवू शकला नाही. त्याच्या कप्तानीखाली खेळलेल्या विश्व चषकात संघ पहिल्याच फेरीत बाहेर गेला होता. 2007 मध्ये त्याने संघाकडून चौथा वर्ल्‍ड कप खेळला. मात्र पुढच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम-राम ही ठोकला.

शॉनने खेळले 108 टेस्‍ट आणि 303 वनडे

शॉनने आपल्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. संघाकडून 9 व्या क्रमाकांवर फलंदाजीला येऊनही सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा खेळाडू तसेच 189 एकदिवसीय सामने विना शतक ठोकता खेळण्याचा विश्व विक्रमही त्याच्याच नावावर आहे. तसेच टेस्‍ट क्रिकेटमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारा पहिला कर्णधारही शॉनच आहे. शॉनने दक्षिण आफ्रीका संघाकडून 108 टेस्‍ट मॅच खेळले. ज्यात 32.31  च्या सरासरीने 2 शतक आणि 16 अर्धशतकं ठोकत 3 हजार 781 रन बनवले. गोलंदाजी तब्बल 421 विकेट पटकावले. तर एकदिवसीय सामन्यांत 303 वनडेमध्ये 26.45 च्या सरासरीने 3 हजार 519 धावा केल्या. ज्यात 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजी 393 विकेट्स शॉ़नच्या नावावर आहेत. शॉन टी-20 क्रिकेटही खेळले ज्यात 12 सामन्यात 86 धावा करत 15 विकेट पटकावले.

संबंधित बातम्या 

अरेरे! याहून खराब गोलंदाजी पाहिली नसेल, 97 ओव्हर टाकल्या, 281 धावा लुटवल्या, तेव्हा जाऊन पहिली विकेट मिळाली

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

(South African Legendry All Rounder Shaun Pollock Birthday on this day marathi)

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.