SRH vs MI : यूसुफ पठाण हार्दिक पंड्यावर संतापला, सोशल मीडियावर सुनावले खडेबोल

Yusuf Pathan Slams Hardik Pandya : हार्दिक पंड्या याची सध्या वाईट वेळ सुरु आहे. नेटकऱ्यानंतर हार्दिकला माजी क्रिकेटपटूंची टीका सहन करावी लागत आहे. यूसुफ पठाणने सोशल मीडियावरच संताप व्यक्त केला.

SRH vs MI : यूसुफ पठाण हार्दिक पंड्यावर संतापला, सोशल मीडियावर सुनावले खडेबोल
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:56 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची निराशानजक सुरुवात झालीय. मुंबईला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात बुधवारी 27 मार्च रोजी सामना पार पडला. हैदराबादने मुंबईवर 31 धावांनी मात केली. मुंबईने विजयासाठी मिळालेल्या 278 धावांचा पाठलाग करताना 246 धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी मुंबईने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईची बॉलिंग फोडून काढली. जसप्रीत बुमराह या एकमेव गोलंदाजाने टिच्चून मारा करत फक्त 9 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. मात्र कॅप्टन हार्दिकने पहिल्या 11 ओव्हरपैकी 1 ओव्हरच बुमराहला दिली. याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर यूसुफ पठाण याने हार्दिकला खडेबोल सुनावले आहेत.

युसूफ पठाण याने एक्स (ट्विटर) पोस्ट करत हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच हार्दिकच्या निकृष्ठ नेतृत्वामुळेच हैदराबादला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या, असंही यूसुफने म्हटलंय. एकूणच काय तर यूसुफने हार्दिकची चांगलीच शाळा घेतलीय. तसेच हार्दिकच्या न पटलेल्या निर्णयाबाबतही त्याने आश्चर्य व्यक्त केलंय. यूसुफने त्याच्या एक्स पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय ते जाणून घेऊयात.

यूसुफच्या ट्विटमध्ये काय?

“हैदराबादने 11 ओव्हरमध्ये 160 पेक्षा अधिक धावा केल्या. आतापर्यंत बुमराहला फक्त 1 ओव्हरच का दिली? तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाला ओव्हर द्यायला पाहिजे. मला वाटतं हार्दिकची ही वाईट कॅप्टन्सी आहे”, असं म्हणत यूसुफने आपला संताप व्यक्त केला. यूसुफने हे ट्विट हैदराबादच्या बॅटिंग दरम्यान केलं.

यूसुफचा हार्दिकवर राग

हार्दिकवर नेटकऱ्यानंतर माजी क्रिकेटपटूंचा संताप

दरम्यान हार्दिकवर मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केलीच आहे. हार्दिकला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतोय. अशात हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर हार्दिकवर माजी क्रिकेटपटूंचा टीकेची झोड उठली आहे.

Non Stop LIVE Update
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...