सचिन तेंडुलकरने रैनाला त्यांचा मुलगा बनवलं, काय घडलं 30 हजार फूट उंचीवर? जाणून घ्या विनोदी किस्सा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे. इतक्या वर्षानंतर सुरेश रैनाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना हा विनोद ऐकून हसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ड्रेसिंग रूम याबाबतचे अनेक किस्से आपण वाचले, ऐकले असतील. सचिन तेंडुलकरची प्रत्येकाला आदरयुक्त भीती होती. पण सचिन तेंडुलकर सर्व सहकाऱ्यांसोबत हसत खेळत विनोद करायचा. अनेक खेळाडूंनी आपआपल्या मुलाखतीत त्याबाबत सांगितलं आहे. असं असताना सुरेश रैनाने त्याच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने 30 हजार फुट उंचीवर काही गप्पा मारल्यानंतर सुरेश रैनाला मुलगा बनवलं. सुरेश रैना भारतीय संघात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडली होती. अलिकडेच सुरेश रैनाने हा विनोदी किस्सा शेअर केला. सुरेश रैनाने एका मुलाखतीदरम्यान सचिन तेंडुलकरबाबत ही बाब सांगितली. ‘चीकी सिंगल्स’ या कार्यक्रमात बोलताना त्याने हा उलगडा केला. ‘मी जेव्हा 18 वर्षांचा होतो. तेव्हा आम्ही एक कसोटी सामना खेळणार होतो. मी बिझनेस क्लासमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या शेजारी बसलो होतो.’
सचिन तेंडुलकरचा किस्सा सांगताना त्याने पुढे सांगितलं की एक एअर होस्टेस आमच्या जवळ आणि म्हणाली, ‘गुड मॉर्निंग, सचिन सर कसे आहात?’ त्यानंतर एअर होस्टेसकडून एक गंमतीदार किस्सा घडला. पुढे ती म्हणाली की, ‘हाय अर्जुन, कसा आहेस? तुझी आई कशी आहे.’ मी काही बोलणार इतक्यात सचिन तेंडुलकरने रैनाला थांबवलं आणि विनोद करण्याची संधी हेरली. सचिन तेंडुलकरने एअर होस्टेसला सांगितलं की, ‘हो, तो अजिबात अभ्यास करत नाही, मी काय करू? मी अंजलीला देखील सांगितलं आहे.’ सचिन तेंडुलकरचं विनोदीबुद्धी पाहून रैनाला धक्काच बसला. सुरेश रैनाने पुढे सांगितलं की, मग आम्ही इतर खेळाडू बसले होतो तिथे गेलो.
मी अचानक बोललो की तुम्ही मला बिझनेस क्लासमध्ये का बसवत आहात? तुम्ही मला अर्जुन तेंडुलकर बनवलं आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरने एअर होस्टेसला बोलवलं आणि स्पष्ट केलं की, हा भारतीय संघाचा खेळाडू आहे. हा सुरेश रैना आहे, माझा मुलगा नाही. यानंतर एअर होस्टेसने माझी माफी मागितली. सचिन तेंडुलकरला असा विनोद करणं खूपच आवडायचं. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना 2011 वनडे वर्ल्डकप विजयी संघाचे सदस्य आहेत.
