AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादव सोडणार मुंबईची साथ? आयपीएल स्पर्धेदरम्यान खळबळ, सूर्या म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धा आता रंगात आली आहे. सर्व खेळाडू फ्रेंचायझीसाठी जीवाचं रान करून खेळत आहेत. आपल्याकडून कोणतीच चूक होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आहे. असं असताना सूर्यकुमार यादवच्या बातमीने खळबळ उडाली आहे.

सूर्यकुमार यादव सोडणार मुंबईची साथ? आयपीएल स्पर्धेदरम्यान खळबळ, सूर्या म्हणाला...
सूर्यकुमार यादवImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 02, 2025 | 10:11 PM
Share

आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादवला फलंदाजीत सूर गवसताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं आहे. असं सर्व काही मस्तपैकी सुरु असताना एक धक्कादायक बातमीने चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सूर्यकुमार यादव मुंबई सोडणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. नुसत्या शक्यतेच्या चर्चांना उधाण आलं. अनेकांनी मुंबई इंडियन्स संघ गृहीत धरला होता. पण ही बातमी मुंबई क्रिकेट टीमबाबत होती. पण त्या चर्चेत तरी दम आहे का? असा प्रश्न होता. त्यामुळे नेमकं काय झालं याची चर्चा सुरु जाली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु असताना मध्येच असं काय? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. तर काही संघांनी देशांतर्गत क्रिकेटसाठी तयारी सुरु केली आहे. यापैकी गोवा संघाने नव्या सिझनसाठी संघ मजबूत करण्याची तयारी केली आहे. कारण गोवा संघाला रणजी ट्रॉफीत एलीट ग्रुपमध्ये प्रमोशन मिळालं आहे. त्यामुळे मजबूत संघांशी सामना करण्यासाठी गोवा क्रिकेट संघ चांगल्या खेळाडूंना संघात सहभागी करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे अशी अफवा उडाली आहे.

अफवा उडाल्यानंतर खुद्द सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्टीकरण दिल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या सोशल मिडिया उकाउंटवर पोस्ट करत लिहिलं की त्या रिपोर्टमध्ये काहीच तथ्य नाही. या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने म्हटले की जर त्यांना अशा रिपोर्टवर हसायचे असेल तर विनोदी चित्रपट पाहणे थांबवतील आणि फक्त असे रिपोर्ट वाचतील.

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या सचिव शंभा देसाई यांनी सांगितले की, जीसीएने देशातील विविध राज्यांमधील संघांमधील अनेक खेळाडूंशी संपर्क साधला आहे. यशस्वी जयस्वाल गोव्याला जात असल्याच्या बातमीनंतर लगेचच ही सर्व माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गोवा संघात सामील होऊ इच्छित आहे. यासाठी जयस्वाल यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) साठी अर्ज केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.