AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World cup 2021, IND vs PAK : सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी गेमचेंजर; दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटूला विश्वास

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम म्हणाला की, "आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या निराशाजनक विक्रमाचा या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही."

T20 World cup 2021, IND vs PAK : सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी गेमचेंजर; दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटूला विश्वास
Suryakumar Yadav
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 11:58 AM
Share

मुंबई : भारत आणि पाकिस्तान रविवारी T-20 विश्वचषकात एकमेकांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम म्हणाला की, “आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या निराशाजनक विक्रमाचा या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही.” (Suryakumar Yadav will be game-changer for India in T20 World Cup 2021 says Wasim Akram)

पाकिस्तानच्या या माजी डावखुऱ्या गोलंदाजाने म्हटले आहे की, सूर्यकुमार यादव या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. पॉवरप्लेच्या नंतरच्या षटकांमध्ये त्याच्या ‘360’ डिग्री शॉट्सची क्षमता त्याला एक विशेष खेळाडू बनवते. वसीम अक्रम आज तक या वृत्तवाहिनीशी बोलत होता.

अक्रम म्हणाला की, ‘सूर्यकुमार यादव भारतासाठी ‘गेम चेंजर’ खेळाडू असेल. तो 6 (पॉवरप्ले) षटकांनंतर सामन्याची दिशा बदलू शकतो. मी त्याचे शॉट्स पाहिले आहेत, तो कोलकाता नाईट रायडर्स (2012 आणि 2014) मध्ये माझ्याबरोबर (अक्रम या काळात केकेआर संघाचा मार्गदर्शक होता) होता. गेल्या काही काळात सूर्यकुमारने त्याच्या कामगिरीत खूप सुधारणा केली आहे.

अक्रम म्हणाला, ‘सूर्यकुमार एक शानदार खेळाडू झाला आहे. तो सुरक्षित शॉट्स खेळतो, थांबत नाही, त्यामुळे त्याने असेच खेळावे. अक्रमला वाटते की, बीसीसीआयने गेल्या दशकात देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या बदलांमुळे संघाला सूर्यकुमारसारखा खेळाडू मिळाला आहे.

अक्रम म्हणाला, ‘मी अजिंक्यकडून (रहाणे) ऐकले की बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे. आता तुम्हाला त्याची फळे मिळत आहेत. विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने अक्रमला वाटते की, यामुळे त्याला स्पर्धेत कोणत्याही दबावाशिवाय क्रिकेट खेळण्यास मदत होईल.

युनूस खानला जुने रेकॉर्ड बदलण्याची अपेक्षा

पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानला आशा आहे की, आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या महामुकाबल्यात पाकिस्तान भारताला हरवून 5-1 असा नवा विक्रम प्रस्थापित करेल. तो म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामन्यात खूप दडपण असते आणि जो खेळाडू हे दडपण सहन करू शकतो तो दिग्गज बनतो. उभय संघांमध्ये उद्या दुबईत टी-20 सामना खेळवला जाणार आहे.

युनूस खान म्हणाला की, पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून मला आशा आहे की, या टी -20 विश्वचषकात 5-0 चा विक्रम 5-1 असा होईल. हा अतिशय दडपणाचा सामना असेल. जे खेळाडू हे दडपण सहन करतील त्यांना महान खेळाडू म्हटले जाईल. 2009 च्या टी-20 विश्वचषक ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवणाऱ्या युनूसचे मत आहे की, एमएस धोनीला ड्रेसिंग रूममध्ये मेंटॉर म्हणून ठेवणे हा या मेगा इव्हेंटमध्ये भारतासाठी एक मोठा प्लस पॉईंट आहे, कारण धोनी मोठ्या दबावाच्या सामन्यात खेळू शकतो. मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका तो निभावणार आहे. त्याच्यात वातावरण शांत ठेवण्याची आणि अति दडपण असलेला सामना जिंकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ स्वतःच कोसळू शकतो.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री

(Suryakumar Yadav will be game-changer for India in T20 World Cup 2021 says Wasim Akram)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.