AFG vs UGA : अफगाणिस्तान युगांडा या सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, सामना फिरवण्याची ठेवतात ताकद
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पाचवा सामना अफगाणिस्तान आणि युगांडा यांच्यात 4 जूनला होणार आहे. युगांडाची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळत आहे. मात्र इथपर्यंत प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यामुळे हलक्यात घेणं अफगाणिस्तानला चांगलंच महागात पडू शकतं. या सामन्यात दोन्ही संघातील काही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. कोण ते जाणून घेऊयात

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत अफगाणिस्तान आणि युगांडा हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आतापासून लागली आहे. युगांडा टीमने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत क्वॉलिफाय केलं आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाची धुरा राशिद खानच्या हाती आहे. तर युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबा आहे. टी20 फॉर्मेटमध्ये तसं पाहिलं तर कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे युगांडाचा संघही अफगाणिस्तानवर भारी पडू शकतो. अफगाणिस्तानने सराव सामन्यात स्कॉटलँडचा 55 धावांनी धुव्वा उडवला होता. तर युगांडाचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे संघाचा अंदाज घेणं कठीण आहे. तरीही या सामन्यात अफगाणिस्तानकडून 8, तर युगांडाकडून 3 खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात.
युगांडा संघाने गेल्या वर्षी 35 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच वगळता सर्व जिंकले आहेत. म्हणजे 30 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्यातील पराभव एकदम काठावरचा आहे.युगांडाचा आफ्रिकेबाहेरचा विक्रम तसा काही प्रभावी नाही. युगांडाने क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वेला पराभूत करत उलटफेर केला होता. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 136 धावा दिल्या होत्या. हे आव्हान युगांडाने 19.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं होतं.
अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाज, इब्राहिम जाद्रान, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, अझमतुल्लाह उमरजई, राशिद खान, नवीन उल हक, मुजीब उर रहमाना यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर युगांडाकडून रोजर मुकासा, दिनेश नकरानी, अल्पेश रमजानी हे चांगली कामगिरी करू शकतात. गुलबदीन नायब सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. अष्टपैलू म्हणून युगांडाचे दिनेश नकरानी आणि अल्पेश रामजानी चांगली कामगिरी करत आहेत. तर अफगाणिस्तानचा राशिद खान एकहाती सामना फिरवण्याची ताकद ठेवतो.
दोन्ही संघांचे खेळाडू
युगांडा संघ: रोनक पटेल, रॉबिन्सन ओबुया, अल्पेश रामजानी, रॉजर मुकासा (विकेटकीपर), रियाजत अली शाह, दिनेश नाकराणी, ब्रायन मसाबा (कर्णधार), केनेथ वायस्वा, कॉस्मास क्यूवुता, जुमा मियागी, हेन्री सेन्योन्डो, फ्रेड अचेलम, फ्रँक बी एनसुबुगा हसन, सायमन सेसाझी.
अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज, गुलबद्दीन नायब, इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद इशाक (विकेटकीपर), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद मलिक, करीम जनात, नूर अहमद.
