Year Ender 2025: ॲपलपासून ओप्पोपर्यंत ‘या’ कंपन्यांनी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फोन केले लाँच, जाणून घ्या लीस्ट
भारतात प्रीमियम स्मार्टफोनची मागणी हळूहळू वाढत आहे आणि लोक अधिकाधिक महागडे फोन खरेदी करत आहेत. आजच्या इयर-एंडरमध्ये आपण या वर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोणते फोन लाँच झालेत ते जाणून घेऊयात.

भारतीय स्मार्टफोन बाजारात गेल्या काही दिवसांपासून प्रीमियम फोनची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या मागणीनुसार अनेक मोबाईल कंपन्यांनी पॉवरफुल वैशिष्ट्यांसह महागडे फोन लाँच करण्यास सुरुवात केली. सॅमसंग आणि ॲपलसह अनेक कंपन्यांनी यावर्षी भारतात 1 लाख पेक्षा जास्त किमतीचे नवीन फोन लाँच केले. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की 2025 या वर्षात कोणत्या कंपनीने कोणते प्रीमियम फिचर्ससह स्मार्टफोन लाँच केले.
सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा
सॅमसंग कंपनीने 2025 या वर्षाच्या सुरुवातीला सॅमसंग गॅलेक्सी एस25अल्ट्रा लाँच केला. त्याची किंमत 1,29,999 रुपये आहे. तर हा स्मार्टफोन प्रभावी फिचर्सने परिपूर्ण आहे. यात 6.9-इंचाचा QHD+ डायनॅमिक LTPO AMOLED 2X डिस्प्ले आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटद्वारे समर्थित, यात 5,000mAh बॅटरी आणि मागील बाजूस 200MP चा प्राथमिक कॅमेरा असलेला क्वाड-कॅमेरा सेटअप आहे.
शाओमी 15 अल्ट्रा
चीनी कंपनी शाओमीने मार्चमध्ये हा प्रीमियम फोन लाँच केला होता. यात 6. 73 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा QHD+ 120Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीने यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आणि जलद चार्जिंग सपोर्टसह 5410 mAh बॅटरी दिली आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 50MP + 50MP + 200MP क्वाड कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी यात 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर त्याची किंमत 1.09 लाख रुपये आहे.
आयफोन 17 प्रो मॅक्स
ॲपलने सप्टेंबरमध्ये आपला फ्लॅगशिप मॉडेल आयफोन 17 प्रो मॅक्स लाँच केला. लक्षणीय अपग्रेडसह येणाऱ्या या आयफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. अॅपलच्या नवीनतम A19 प्रो चिपसेटद्वारे समर्थित या फोनमध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 18MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याची सुरुवातीची किंमत 1.49लाख रूपये आहे.
ओप्पो फाइंड एक्स9 प्रो
ओप्पोने गेल्या महिन्यात त्यांचा प्रीमियम डिव्हाइस, ओप्पो फाइंड एक्स9 प्रो लाँच केला, ज्यामध्ये 6.78-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3600 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेटद्वारे समर्थित, हा फोन 7,500 एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे. यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर, 50 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि मागील बाजूस 200 एमपी टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची किंमत 1,09,999 रूपये आहे.
