Team India: 3 सामने योगदान 0, तरीही कॅप्टन रोहित सुपर 8 मध्ये देणार संधी!

T20 World Cup 2024 Team India: टीम इंडियाचा स्टार ऑलरांउडर टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलाय. त्याला साखळी फेरीतील 3 सामन्यात ना एक धाव करता आली 1 विकेट घेता आली ना 1 कॅचचं योगदान तो देऊ शकला.

Team India:  3 सामने योगदान 0, तरीही कॅप्टन रोहित सुपर 8 मध्ये देणार संधी!
rohit sharma and umpire team indiaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 11:43 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीत अजिंक्य राहिलेल्या टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 20 जून रोजी पार पडणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र आता रोहित सुपर 8 साठी बदल करणार का? हा चर्चेचा विषय ठरतोय. मात्र वेस्ट इंडिजमधील खेळपट्टीनुसार टीम इंडियाने एक स्पेशल स्पिनरसह उतरावं, असं दिग्गजांचं मत आहे. विंडिजमधील खेळपट्ट्या या फिरकीपटूंसाठी पोषक असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पा याने आधीच सिद्ध केलं आहे.

टीम इंडिया लीग स्टेजमध्ये रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या 2 ऑलराउंडर्ससह खेळली. अक्षर पटेल याने 23 विकेट्स घेतल्या तर जडेजाला अपयश आलं. इतकंच काय, तर जडेजाला एक धावही करता आलेली नाही. तसेच त्याने फिल्डिंगमध्येही या आयसीसी स्पर्धेत काही विशेष केलेलं नाही. आता प्लेईंग ईलेव्हमध्ये सुपर 8 साठी कुलदीप यादव याला संधी द्यावी की जडेजाला कायम ठेवावं, अशी चर्चा आहे. यावरुन न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज स्टीफन फ्लेमिंगने प्रतिक्रिया दिली आहे. “खेळपट्टीमुळे चेंडू वळवण्यासाठी पोषक असेल तर कुलदीप प्रभावी ठरेल. कुलदीपचा जास्त फायदा होईल जेणेकरुन स्पर्धेच्या आणखी जवळ पोहचण्यात मदत होईल”, असं फ्लेमिंगने स्पष्ट केलं.

टीम इंडियाच्या संतुलनाबाबत फ्लेमिंगने प्रतिक्रिया दिली. “टीम इंडियाकडे कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी संतुलित टीम आहे. यशस्वी जयस्वाल हा चांगला खेळाडू आहे. माझ्यानुसार ही एक असा संघ आहे की ज्याची निवड ही काही अंशी फायनलच्या हिशोबाने करण्यात आली आहे. तसेच टीममध्ये असे स्पिनर्स आहेत, जे प्रतिस्पर्धी संघांवर वरचढ ठरतील. तसेच असेही खेळाडू आहेत, जे स्पिनर्सवर वरचढ होतील. आपण पाहिलंय की विंडिजमध्ये स्पिनचं महत्तव काय आहे”, असंही फ्लेमिंगने म्हटलं.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.

Non Stop LIVE Update
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.