AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : 19 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, झिंबाब्वेच्या संघाला धू धू धुतलं, भारताची वादळी फटकेबाजी

टी20 वर्ल्ड कपमध्ये सध्या सुपर 8 फेरीमधली सामने सुरू आहेत. भारतानं आज झिंबाब्वेविरोधात तुफान फटकेबाजी केली आहे. झिंबाव्बेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर मैदानात तुफान आल्याचं पहायला मिळालं.

T20 World Cup : 19 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, झिंबाब्वेच्या संघाला धू धू धुतलं, भारताची वादळी फटकेबाजी
India vs ZimbabweImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 9:18 PM
Share

टी 20 वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. पहिल्या फेरीमध्ये भारतानं आपले सर्व सामने जिंकले होते.  मात्र सुपर 8 च्या फेरीमध्ये पहिल्याच सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला, दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाचा दणका दिला, दरम्यान या पराभवामुळे भारत आता उपांत्य फेरीमध्ये पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. उपांत्य फेरीतील समीकरण हे खूपच गुंतागुंतीचं झालं होतं. मात्र गुरुवारी भारतासाठी दोन गुड न्यूज आल्या. एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजीचा पराभव केला. वेस्ट इंडीजच्या पराभवामुळे उपात्य फेरीत पोहोचण्याचा भारताचा मार्ग सोपा झाला. दरम्यान या सामन्यानंतर आज दुसरा सामना आणि टी20 वर्ल्ड कपमधील 48 वा सामना भारत आणि झिंबाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यामध्ये सुरू आहे.

झिंबाब्वेने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचं पहायला मिळालं, भारतानं झिंबाब्वेची गोलंदाजी फोडून काढली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना झिंबाब्वेला विजयासाठी तब्बल 257 धावांंचं आव्हान दिलं आहे. याचसोबत भारतानं 19 वर्ष जुना आपलाच रेकॉर्ड तोडला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारताची सर्वोच्च धावसंख्या ही 220 एवढी होती, परंतु भारतानं हा आपला रेकॉर्ड मोडला असून, झिंबाब्वे विरोधात 256 धावा फटकावल्या आहेत. गेल्या काही सामन्यात अभिषेक शर्माला चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र या सामन्यात त्याने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याने 30 बॉलमध्ये 4 फोर आणि 4  सिक्स मारले. अभिषेक शर्मासोबतच हार्दिक पांड्याने देखील 50 धावा केल्या.  तिलक वर्माने 44 धावा फटकावल्या त्याने 16 बॉलमध्ये 3 चौके आणि 4 सिक्स मारले.  दरम्यान अजून झिंबाब्वेची इनिंग  बाकी आहे.

या सामन्यानंतर आता भारताचा सामना सुपर 8 मध्ये वेस्ट इंडीजसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघासाठी करा किंवा मराची स्थिती असणार आहे. जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता भारताच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरोधात आज पराभव झाल्यामुळे पुढचा सामना जिंकण्याच वेस्ट इंडीजचा प्रयत्न असेल.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला