T20 World Cup India vs Scotland live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध स्कॉटलंड सामना

T20 World Cup: विश्वचषकातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मात देत पुनरागमन तर केलं आहे. पण पुढील फेरीत प्रवेशासाठी आणखी बरेच अडथळे आहेत. त्याती एक म्हणजे आजचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना.

T20 World Cup India vs Scotland live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध स्कॉटलंड सामना
भारत विरुद्ध स्कॉटलंड

T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघासाठी (India Cricket team) सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. यंदाच्या टी -20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) भारतीय संघाचा हा चौथा सामना असून भारतासमोर स्कॉटलंडचे (India vs Scotland) आव्हान आहे. पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर भारताने तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. पण सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने भारताला अनेक अडचणी आहेत. यातील एक म्हणजे आजचा सामना असून या सामन्यात स्कॉटलंड विरुद्ध एका अत्यंत तगड्या विजयाची भारताला गरज आहे.

भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ 4 पैकी 4 सामने याआधीच सेमीफायनलच्या लढाईत पोहोचला आहे. आता या गटातून आणखी एक कोणता संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असली तरी भारताला आजच्या आणि नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे. तसंच न्यूझीलंडने भारताला मात दिली असल्यामुळे न्यूझीलंडला अफगाणिस्तानने मात दिल्यास भारत न्यूझीलंडच्या पुढे जाईल. त्यात नेट-रनरेट एक मोठी गोष्ट असल्याने भारताला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे.

भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील टी – 20 विश्वचषकाचा सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा चौथा सामना आज शुक्रवारी (5 नोव्हेंबर) स्कॉटलंड विरुद्ध सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील आजचा टी -20 सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाईल.

भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.

भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

संभाव्य भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी.

संभाव्य स्कॉटलंड संघ: जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल.

हे ही वाचा :

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

T20 World Cup 2021: केवळ 38 चेंडूत ऑस्ट्रेलियाने संपवला सामना, बांग्लादेशला मात देत सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल

(T20 world cup india vs Scotland live streaming when and where to watch online match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI