AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wriddhiman Saha | रिद्धीमान साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?

टीम इंडियाचा (Team India) विकेटकीपर फलंदाज (Wriddhiman Saha) रिद्धीमान साहा दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा (corona Positive For 2nd Time) झाली आहे.

Wriddhiman Saha | रिद्धीमान साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?
Wriddhiman Saha
| Updated on: May 14, 2021 | 4:07 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज आणि विकेटकीपर रिद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. स्वत: रिद्धीमानने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  आयपीएलमध्ये (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळणाऱ्या साहाला 14 व्या मोसमादरम्यान पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर रिद्धीमानने स्वत:ला आयसोलेट केलं होतं. बायोबबलमधील इतर खेळाडूंनाही कोरोनाची बाधा झाली होती. यामध्ये रिद्धीमानचा समावेश होता. वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. (Team India and srh batsman Wriddhiman Saha Tested corona Positive For 2nd Time)

साहा काय म्हणाला?

“कोरोना झाल्याने मी घाबरलो होतो. माझे कुटुंबिय चिंतेत होते. माझी पुरेशी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मी यातून बरा होत आहे”, अशी प्रतिक्रिया साहाने दिली. रिद्धीामानला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. साहाला सुरुवातीला ताप होता. मात्र आता तो त्यातून सावरला आहे. साहा ठणठणीत आहे. पण त्याला आयसोलेशनमधून बाहेर पडण्यासाठी पुढील कोरोना चाचणी निगेटिव्ह येणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान साहाला कोणतीही लक्षणं नसला तरी तो निगेटिव्ह आलेल नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी धोक्याची घंटा असू शकते. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये साहाचाही समावेश आहे. इंग्लंडला रवाना होण्यासाठी विराटसेनेला मे अखेरीस मुंबईत एकत्र व्हायचे आहे. यासाठी साहाचे लवकरात लवकर बरे व्हावे लागणार आहे. असं न झाल्यास साहाला या दौऱ्याला मुकावेही लागू शकते.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

संबंधित बातम्या : 

Yuzvendra Chahal | महेंद्रसिंह धोनीनंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण

Ramesh Powar | दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी

(Team India and srh batsman Wriddhiman Saha Tested corona Positive For 2nd Time)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.