AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड दौऱ्यावरून गौतम गंभीर तातडीने घरी परतणार, एक फोन आला आणि…

टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिकेची तयारी करत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेत विजयाची दडपण असताना गौतम गंभीरला घरून कॉल आला आणि तातडीने निघण्याची तयारी करावी लागली.

इंग्लंड दौऱ्यावरून गौतम गंभीर तातडीने घरी परतणार, एक फोन आला आणि...
गौतम गंभीरImage Credit source: PTI
| Updated on: Jun 13, 2025 | 2:45 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पाच दिवसांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा नसल्याने या मालिकेत अनुभवाची उणीव आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची कसोटी लागणार आहे. टीम इंडिया 13 जून ते 16 जून दरम्यान इंट्रा स्कॉड सामना होणार आहे. या सामन्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी प्रशिक्षक गौतम गंभीरला करायची आहे. असं असताना प्रशिक्षक गौतम गंभीरला तातडीने भारतात परतावं लागलं आहे. आईची तब्येत खराब असल्याने गौतम गंभीरने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या आयसीयुमध्ये दाखल केलं असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. भारतात आल्यानंतर गौतम गंभीर इंग्लंडला कधी परतेल याबाबत सुरुवातीला काहीच सांगण्यात आलं नव्हतं. कारण आईच्या तब्येतीवर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहे. पण आता 17 जूनपर्यंत टीम इंडियासोबत ज्वॉईन होईल असं सांगण्यात येत आहे.

गौतम गंभीरच्या गैरहजेरीत इंट्रा स्कॉड सामन्यातून आता सपोर्ट स्टाफला खेळाडूंची निवड करावी लागू शकते. कारण गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यावर परत कधी हे काही स्पष्ट नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी गौतम गंभीरवर आलेलं संकट टळावं यासाठी प्रार्थना करत आहे. जेणेकरून गौतम गंभीरच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाला पहिल्या कसोटीपासून होईल. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला इंग्लंडमध्ये अनुभवाची उणीव भासेल. त्यामुळे गौतम गंभीरचं टीम इंडियासोबत असणं गरजेचं आहे.

गौतम गंभीरची आई सीमा गंभीर यांना 11 जून रोजी हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच कुटुंबियांनी याबाबतची माहिती प्रशिक्षक गौतम गंभीरला दिली. त्यानंतर त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, गौतम गंभीर पहिला कसोटी सामना सुरू होण्याच्या 3 दिवस आधी इंग्लंडला परतेल. म्हणजेच 17 जूनपर्यंत टीम इंडियासोबत असेल. जर असंच घडलं तर टीम इंडियासाठी चांगली बातमी असणार आहे.

कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.