IND vs SL : श्रीलंकन फलंदाजांची मधली फळी पुन्हा ‘फेल’, मोठे लक्ष्य देण्यापासून श्रीलंका हुकली

सुरुवातीला काहीशी निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजानी सामन्यात पुनरागमन करत श्रीलंकेच्या फलंदाजाना एका मागोमाग एक बाद केलं. ज्यामुळे विजयासाठी भारतासमोर केवळ 276 धावांचेच लक्ष आहे.

IND vs SL : श्रीलंकन फलंदाजांची मधली फळी पुन्हा 'फेल', मोठे लक्ष्य देण्यापासून श्रीलंका हुकली
भारत विरुद्ध श्रीलंका

कोलंबो : भारत (Indian Cricket Team) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाने 276 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाने चरित असालंका (65) आणि अविष्का फर्नांडो (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सामन्यात भक्कम स्थान मिळवलं. त्यानंतर चमिका करुणारत्ने यांच्या नाबाद 44 धावांच्या मदतीने 9 विकेट्सच्या बदल्यात 275 धावा केल्या.

भारताने सामन्याच्या सुरुवातीला काहीशी निराशाजनक गोलंदाजी केली. ज्यामुळे 13 ओव्हरनंतर 77 धावा झाल्या असतानाही एकही विकेट गेला नव्हता. पण त्यानंतरच गोलंदाजानी पुनरागमन करत एका मागोमाग एक श्रीलंकन फलंदाजाना तंबूत धाडलं. यात युझवेंद्र चहलने आणि उपकर्णधार भुवनेश्वरने प्रत्येकी  तीन विकेट घेतल्या. तर दिपक चहारने 2 विकेट घेतल्या. य़ाशिवाय एक श्रीलंकन फलंदाज धावचित झाल्याने श्रीलंका संघ 50 ओव्हरनंतर 275 वर 9 बाद या स्थितीत राहिला. ज्यामुळे भारताला विजयासाठी 276 धावांची गरज होती.

श्रीलंकेचा करुणारत्ने ठरला ‘X फॅक्टर’

पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही श्रीलंका संघ उत्तम अशी सुरुवात करुनही एक मोठा स्कोर उभा करु शकली नाही. याची चूक संघाच्या मध्या फळीने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. पण या दोन्ही वेळी श्रीलंकेचा खालच्या फळीतील फलंदाज जो मुख्यता गोलंदाजीसाठी ओळखला जातो त्या चमिका करुणारत्नेने संघासाठी धमाकेदार फलंदाजी करत एक आव्हानात्मक लक्ष्य मिळवून दिलं. पहिल्या सामन्यात तुफान अशी नाबाद 43 धावांची खेळी करणाऱ्या करुणारत्ने याने दुसऱ्या सामन्यातही पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा ठोकल्या आणि श्रीलंकेचा ‘x फॅक्टर’ ठरला.

हे ही वाचा

IND vs SL : सहा वर्षात पहिल्यांदाच नो बॉल, भारताच्या हुकमी गोलंदाजाची छोटी चूक, मोठा विक्रम तुटला

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

(Team India needs 276 runs to Win 2nd ODI Against Sri lanka)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI