Rishabh Pant | रिषभ पंत विकेटकीपींगमध्ये नक्कीच सुधारणा करेल : रिद्धीमान साहा

रिषभ पंतने (Rishabh Pant Wicketkeeping) ऑस्ट्रेलियाविरोधात खराब विकेटकीपिंग केली. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:23 PM, 25 Jan 2021
Rishabh Pant | रिषभ पंत विकेटकीपींगमध्ये नक्कीच सुधारणा करेल : रिद्धीमान साहा
रिषभ पंत

मुंबई :रिषभ पंत (Rishabh Pant) विकेटकीपींगमध्ये (Wicketkeeping) सुधारणा करेल. पहिल्याच इयत्तेत कोणी बीजगणित शिकत नाही”, असं म्हणत टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) पंतची पाठराखण केली आहे. रिद्धीमान एका मुलाखतीत बोलत होता. यावेळेस त्याला पंतच्या विकेटकीपिंगबाबत विचारण्यात आलं. यावेळेस त्याने ही प्रतिक्रिया दिलीय. “आपण नेहमी हळुहळु एक एक गोष्ट शिकतो. पंत चांगली कामगिरी करतोय. तो आपल्या विकेटकीपींगमध्ये नक्कीच सुधारणा करेल. पंत परिपक्व खेळाडू आहे. त्याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे. तो टीम इंडियासाठी भविष्यात महत्वाची भूमिका बजावेल”, असा विश्वास साहाने व्यक्त केला. (Team india Wriddhiman Saha tell about rishabh pant Wicketkeeping)

पंतवर जोरदारा टीका

पंतने ऑस्ट्रेलियाविरोधात ढिसाळ विकेटकीपींग केली. स्टंपमागे त्याने अनेक सोप्या कॅच सोडल्या. या कॅच सोडल्याने पंतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.पंतला संघाबाहेर करायला हवं. पंतच्या जागी रिद्धीमान साहाला संघात स्थान द्यायला हवं, अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात येत होती. मात्र पंतने ऑस्ट्रेलियाविरोधातील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 89 धावांची तडाखेदार फलंदाजी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय झाला.

“संधी कोणाला द्याची हा मॅनेजमेंटचा प्रश्न”

पंतने केलेल्या तडाखेदार खेळीमुळे त्याचं कौतुक करण्यात आलं. क्रिकेट चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्यासाठी सोशल मीडियावर कौतुक करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. पंतच्या या खेळीमुळे साहासाठी कसोटीमध्ये टीम इंडियाचे दार बंद झाले, असंही म्हटलं जातंय. यावर साहाने प्रतिक्रिया दिली. “संघात कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही, हा सर्वस्वी टीम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. ती जबाबदारी आपण त्यांच्यावरच सोडायला हवा. मी सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील आहे ” असं साहा म्हणाला.

“दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध”

पंत आणि माझ्यात मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध आहेत. वाटल्यास तुम्ही पंतला विचारु शकता. आम्ही एकमेकांना प्लेइंग इलेव्हनमध्ये दावेदारी सिद्ध करण्यासाठी सहकार्य करत असतो. आमच्यात वैयक्तिक वाद नाहीत. जो चांगला खेळतो त्याला संधी मिळते. संधी मिळणार की नाही, हे आपल्या हातात नाही. पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, असंही साहाने स्पष्ट केलं.

“धोनी धोनीच राहणार”

ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीत विजयी खेळी केली. तेव्हापासून पंतची महेंद्रसिंह धोनीसोबत तुलना करण्यात येत आहे. मात्र प्रत्येकाचं अस्तित्व आणि ओळख असते. धोनी धोनीच राहणार, असं साहाने स्पष्ट केलं.

दरम्यान टीम इंडिया आता इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

Cheteshwar Pujara | टीम इंडियाचा तारणहार, द्रविडचा वारसदार , ‘The Wall 2’ चेतेश्वर पुजाराचा 33 वा वाढदिवस

IPL 2021 | ना कोच, ना मेन्टॉर, कुमार संगकाराची राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या पदावर निवड

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(Team india Wriddhiman Saha tell about rishabh pant Wicketkeeping)