AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकप स्पर्धेतील 18 वा सामना होणार आहे. या सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा दिवसागणिक रंगतदार वळणावर येत आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या पुढच्या सामन्याचं गणित अवलंबून असल्याचं दिसून येतं. स्पर्धेत पाकिस्तानची स्थिती चांगली आहे. पण ऑस्ट्रेलियाला हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. पाकिस्तानने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 3 पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं होतं. असं असताना पाकिस्तान संघ तापाने फणफणला आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी सोडला तर इतर खेळाडूंना ताप आला आहे. दोन्ही संघ 10 वेळा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमनेसामने आहेत. सहा सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने 4 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे.
पिच रिपोर्ट
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यातील सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक आहे. फलंदाजी करताना बॉल आरामात बॅटवर येईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल. मैदानाच्या परिसरात 31 अंश सेल्सियस इतकं तापमान असेल. तसेच पावसाची कोणतीही शक्यता नाही. पण आर्द्रता 48 अंशाच्या आसपास असेल.
हे खेळाडू ठरतील बेस्ट
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यात मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, मार्नस लाबुशेन,सउद शकील, डेविड वॉर्नर आणि बाबर आझम हे खेळडू बेस्ट ठरतील. तीन सामन्यात याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मोहम्मद रिझवान, मिचेल स्टार्क, हसन अली कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार ठरतील. अब्दुल्लाह शफिक, एडम झम्पा, शाहीन आफ्रिदी हे खेळाडू टॉप असतील. तर हरिस रउफ, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन हे बजेट खेळाडू ठरतील.
बेस्ट टीम अशी ठरू शकते
मोहम्मद रिझवान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सउद शकील, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद नवाज, एडम झाम्पा, मिचेल स्टार्क, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ, हसन अली.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इनग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), एडम झाम्पा, जोश हेझलवूड.
पाकिस्तान : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सउद शकील, इफ्तिखार अहमद, उसमा मिर, हारिस रउफ, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद नवाज.
