AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI Wolrd Cup 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियात या सहा वेगवान गोलंदाजांची जागा पक्की, पण…

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण टीम इंडियाने आतापासूनच या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. 20 खेळाडूंनी नावं या स्पर्धेसाठी निश्चित केली आहेत. यात सहा वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

ODI Wolrd Cup 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियात या सहा वेगवान गोलंदाजांची जागा पक्की, पण...
ODI Wolrd Cup 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियात या सहा वेगवान गोलंदाजांची जागा पक्की, पण...Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 23, 2026 | 7:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली असून जेतेपदावर नाव कोरलं. आता टीम इंडियाने पुढचं लक्ष्य निश्चित केलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असेल याची आखणी आतापासूनच केली जात आहे. यासाठी भारतीय निवडकर्त्यांना 20 नावं ठरवली आहेत. या 20 खेळाडूंची चाचपणी आयपीएल 2026 स्पर्धेपासून होणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, निवडकर्ते या 20 खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएल दरम्यान लक्ष ठेवून असतील. या 20 खेळाडूंमध्ये 6 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात होणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचं महत्त्व वाढलं आहे. पण सहा वेगवान गोलंदाजांमध्ये एक नाव नाही. मागच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी सहा वेगवान गोलंदाज कोण?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा पैकी दोन वेगवान गोलंदाज तर कन्फर्म आहे. यात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोघांचं नाव निश्चित आहे. तर अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज हे खेळाडू शर्यतीत आहे. त्याचबरोबर दुखापतग्रस्त असलेल्या हर्षित राणाचं नाव देखील या सहा गोलंदाजांमध्ये आहे. पण मागच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा आणि सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी मात्र यात नाही. म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून त्याला डावललं जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. स्पर्धेसाठी अजून बराच अवधी शिल्लक असून निवडकर्त्यांनी खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. खेळाडूंची कामगिरी, फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर आता निवडकर्ते लक्ष ठेवून असतील.

कोणते खेळाडू संघात असू शकतात?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची नाव निश्चित असली तरी त्यापैकी 15 खेळाडू निवडले जाणार आहेत. त्यामुळे पाच खेळाडूंना बसावं लागणार आहे. 15 खेळाडूंमध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा ही चार नावे 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असेल. केएल राहुल, हार्दिक पांड्या यांची नावंही निश्चित मानली जात आहेत. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर ही नावं आघाडीवर आहेत. कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, इशान किशन हे शर्यतीत आहेत. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच्या नावाचा विचार केला जात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?