एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीचं भावूक ट्विट, ABD चा प्रेमळ रिप्लाय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 19, 2021 | 6:38 PM

एबी डिव्हिलियर्स 14 वर्षे आयपीएलचा भाग होता आणि त्यामुळेच भारतीय चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. 2007 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झालेल्या डिव्हिलियर्सने चौथ्या सत्रात आरसीबीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तो या संघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करू लागला.

एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीचं भावूक ट्विट, ABD चा प्रेमळ रिप्लाय
Virat Kohli - AB De villiers

Follow us on

मुंबई : जगभरात मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजेच आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही, तसेच तो बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलियर्सने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जगभरातील क्रिकेटरसिक दुःखी झाले आहेत. तसेच डिव्हिलियर्सचे विविध संघांमधील सहकारीदेखील भावूक झाले आहेत. डिव्हिलियर्स सर्वात जवळचा मित्र आणि त्याचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघातील सहकारी विराट कोहलीदेखील भावूक झाला आहे. याप्रसंगी विराटने एक ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (This hurts my heart; Virat Kohli’s heartfelt message for ‘brother’ AB de Villiers as RCB legend retires)

एबी डिव्हिलियर्स 14 वर्षे आयपीएलचा भाग होता आणि त्यामुळेच भारतीय चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. 2007 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झालेल्या डिव्हिलियर्सने चौथ्या सत्रात आरसीबीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तो या संघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करू लागला. डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर म्हणाला- ‘मी नेहमी आरसीबीचाच राहीन. माझ्यासाठी आरसीबीशी संबंधित प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. लोक येत-जात राहतात पण आरसीबीवरील माझे प्रेम कायम राहील. मी अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

आय लव्ह यू ब्रदर

कोहलीने ट्विट करून लिहिले की, त्याचे मन दुःखी आहे पण डिव्हिलियर्सने स्वत:साठी आणि कुटुंबासाठी योग्य निर्णय घेतला आहे. कोहलीने ट्विट करताना लिहिले आहे की. “तुझ्या निवृत्तीच्या घोषणेने माझे मन दुखावले आहे, परंतु मला माहित आहे की तू नेहमीप्रमाणेच स्वतःसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी योग्य निर्णय घेतला आहेस. आय लव्ह यू.” आपल्या मित्राचा हा मेसेज पाहून डिव्हिलियर्सनेही ‘आय लव्ह यू टू ब्रदर’ असं उत्तर दिलं आहे.

आणखी एका ट्विटमध्ये कोहलीने डिव्हिलियर्सचे त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वर्णन केले आहे. त्याने लिहिले आहे की, “आमच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज. मला भेटलेल्या सर्व लोकांपैकी सर्वात प्रेरणादायी व्यक्ती. तू जे काही केलं आहेस आणि जे काही आरसीबीला दिलं आहे, याचा तुला अभिमान वाटायला हवा. आपली मैत्री या खेळाच्या पुढे आहे आणि नेहमीच राहील.

डिव्हिलियर्सचा भारतीयांसाठी भावनिक संदेश

डिव्हिलियर्सने स्वत:ला अर्धा भारतीय म्हटलं आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी अर्धा भारतीय आणि अर्धा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत राहीन पण माझ्या हृदयात भारताचे विशेष स्थान आहे. अर्धा भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. डिव्हिलियर्सने स्वत:ला अर्धा भारतीय म्हटलं आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी अर्धा भारतीय आणि अर्धा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत राहीन पण माझ्या हृदयात भारताचे विशेष स्थान आहे. अर्धा भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.

14 वर्षांचा प्रवास संपला

एबी डिव्हिलियर्स 14 वर्षे आयपीएलचा भाग होता आणि त्यामुळेच भारतीय चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. 2007 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झालेल्या डिव्हिलियर्सने चौथ्या सत्रात आरसीबीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तो या संघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करू लागला. डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर म्हणाला- ‘मी नेहमी आरसीबीचाच राहीन. माझ्यासाठी आरसीबीशी संबंधित प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. लोक येत-जात राहतात पण आरसीबीवरील माझे प्रेम कायम राहील. मी अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता. एबीडीने त्याच्या कारकिर्दीत 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली आहेत.

इतर बातम्या

IND vs NZ: रोहित शर्माने डगआउटमध्ये जखमी मोहम्मद सिराजला मारलं, VIDEO व्हायरल

नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, दीपक चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली, पाहा VIDEO

IND vs NZ, 2nd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध मालिका विजयाची संधी, मॅच कुठं पाहणार?

(This hurts my heart; Virat Kohli’s heartfelt message for ‘brother’ AB de Villiers as RCB legend retires)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI