IND vs SA : भारताची 2026 मध्ये धमाकेदार ‘ओपनिंग’, दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्या सामन्यात लोळवत मालिका जिंकली
U19 South Africa vs India 2nd ODI Match Result : टीम इंडियाने 21 बॉलआधी 8 विकेट्स राखून दुसरा एकदिवसीय सामना जिंकला आणि मालिका आपल्या नावावर केली. भारताने वैभव सूर्यवंशी याच्या कॅप्टन्सीत ही कामगिरी केली.

अंडर 19 टीम इंडियाने 2026 वर्षात धमाकेदार आणि ग्रँड ओपनिंग केली आहे. टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या नेतृत्वात यूथ वनडे सीरिजमधील दुसरा सामना (U19 IND vs SA 2nd One Day) जिंकला. भारताने या सलग दुसर्या विजयासह मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने एकतर्फी आघाडी घेतली. कर्णधार वैभव सूर्यवंशी या विजयाचा हिरो ठरला. वैभवने विजयी धावांचा पाठलाग करताना स्फोटक अर्धशतक केलं. वैभवला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
जेसन रोल्स याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताला 246 धावांचं आव्हान मिळालं. मात्र खराब प्रकाशामुळे भारताला डीएलएसनुसार 176 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे या सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.
टीम इंडियाची बॅटिंग
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज या सलामी जोडीने भारताला स्फोटक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एरॉन 20 रन्स करुन आऊट झाला. एरॉननंतर वैभवही आऊट झाला. वैभवने 24 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 1 फोरसह 68 रन्स केल्या. वैभवने स्फोटक खेळीसह भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंदु या जोडीने टीम इंडियाचा डाव चालवला. मात्र खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. प्रकाशामुळे या मालिकेत खेळ थांबवण्याची ही दुसरी वेळ ठरली. पहिल्या सामन्यातही खेळ थांबवावा लागला होता.
भारताला सुधारित आव्हान
बराच वेळ वाया गेल्यानंतर अखेर भारताला डीएलएसनुसार 27 ओव्हरमध्ये 174 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. भारताने 23.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंदु या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. वेदांत आणि अभिज्ञान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 92 बॉलमध्ये नॉट आऊट 81 रन्सची पार्टनरशीप केली. वेदांतने 57 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. तर अभिज्ञानने 42 चेंड़ूत नाबाद 48 धावा केल्या.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज किशन सिंह याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर जेसन रोवल्स याने चौथ्या स्थानी बॅटिंग करताना शतक ठोकलं. जेसनने 114 धावा करत दक्षिण आफ्रिकेला 245 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. जेसनने 114 धावांवर आऊट झाला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 49.3 ओव्हरमध्ये 245 रन्सवर ऑलआऊट केलं. भारतासाठी किशनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ दिली.
