U19 World Cup: अहमदाबादवरुन पोहोचला वेस्ट इंडिजमध्ये! फायनलआधी युवा टीमला कोहलीच्या ‘विराट’ टीप्स
मुंबई: ऑस्ट्रेलियाला नमवून दिमाखात अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अंडर 19 टीममधील (India under 19 team) सदस्यांसोबत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) गुरुवारी संवाद साधला. वेस्ट इंडिज मध्ये शनिवारी इंग्लंड विरुद्ध (India vs England) होणाऱ्या फायनलच्या दोन दिवस आधी विराटने युवा खेळाडूंना विजयाचा कानमंत्र दिला. भारताच्या अंडर 19 टीम मधील ऑफ स्पिनर कौशल […]

मुंबई: ऑस्ट्रेलियाला नमवून दिमाखात अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अंडर 19 टीममधील (India under 19 team) सदस्यांसोबत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) गुरुवारी संवाद साधला. वेस्ट इंडिज मध्ये शनिवारी इंग्लंड विरुद्ध (India vs England) होणाऱ्या फायनलच्या दोन दिवस आधी विराटने युवा खेळाडूंना विजयाचा कानमंत्र दिला. भारताच्या अंडर 19 टीम मधील ऑफ स्पिनर कौशल तांबेने त्याच्या सोशल मीडियावर विराट सोबत झालेल्या व्हर्च्युअल संवादाचा स्क्रीनग्रॅब शेअर केला. मोठ्या फायनलआधी विराटने काही अमूल्य सल्ले दिल्याचे कौशलने म्हटलं आहे. ऑलराऊंडर राजवर्धन हंगरगेकरनेही विराटसोबत झालेल्या या संवादाचा स्क्रिनग्रॅब सोशल मीडियावर शेअर केला आहे. “विराट कोहली तुमच्यासोबत खूप चांगला संवाद झाला. आयुष्य आणि क्रिकेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यातून अजून आमच्यामध्ये सुधारणा होईल” असे राजवर्धनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विराट कोहलीला सुद्धा करीयरच्या सुरुवातीला या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेनेच ओळख मिळवून दिली होती. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. विराटच्या नेतृत्वाखाली टीमने त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.

विराट कोहली सध्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी अहमदाबादमध्ये आहे. त्याने युवा संघासोबत व्हर्च्युअल संवाद साधला. यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने काल ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यशने कर्णधारपदाला केलेल्या साजेशा शतकी खेळीमुळे भारताला हा विजय मिळवता आला.
