AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: टीम इंडियाच्या कर्णधाराला तीन बांगलादेशी खेळाडूंनी घेरलं, मग झालं असं…Watch Video

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव सुरु असताना 25 व्या षटकात वाद पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन एकटाच तीन बांगलादेशी खेळाडूंना भिडला.

IND vs BAN: टीम इंडियाच्या कर्णधाराला तीन बांगलादेशी खेळाडूंनी घेरलं, मग झालं असं...Watch Video
IND vs BAN, Video : भारतीय कर्णधार तीन बांगलादेशी खेळाडूंना भिडला, असं झालं होतं की...
| Updated on: Jan 20, 2024 | 7:08 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी जबरदस्त खेळी केली. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकांपासून 32 व्या षटकापर्यंत या दोघांनी बांगलादेशी गोलंदाजांचा घाम काढला. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या. त्यामुळे 25 व्या षटकात बांगलादेशचे गोलंदाज काकुळतीला आले होते. त्यामुळे भारतीय कर्णधाराला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. कर्णधार उदय सहारन यानेही मागे पुढे न पाहता थेट बांगलादेशी खेळाडूंना भिडला. यामुळे पंचांना मध्यस्थी करण्याची वेळ आली. बांगलादेशकडून 25 वं षटक अरिफुल इस्लाम टाकत होता.कर्णधार उदय सहारन फलंदाजी करत होता आणि दुसऱ्याच चेंडूवर स्वीप केला आणि एक धाव घेतली. त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा क्रिझवर परतला. या दरम्यान अरिफुल इस्लामने सहारनला डिवचलं. त्यानंतर भारतीय कर्णधार भडकला तेव्हा बांगलादेशचे इतर खेळाडूंनी धाव घेतली.

सहारनने पंचांना थेट सांगितलं की, बांगलादेशी खेळाडू वारंवार अपशब्द वापरून डिवचत आहेत. तसेच अरिफुलला थेट बोट दाखवत दम भरला. यावेळी समालोचकांनी सांगितलं की, अरिफुलने सुरुवात केली त्यानंतर सहारन भडकल्याचं दिसून आलं. पण बांगलादेशी गोलंदाजाने नेमकं असं काय बोलला ते काही कळू शकलं नाही. मात्र अपशब्द वापरल्यानेत भारतीय कर्णधार सहारन भडकला असावा. भारताकडून आदर्श सिंगने 76, तर कर्णधार उदय सहारन याने 64 धावांची खेळी केली.

बांगलादेशने 2020 अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत केलं होतं. तसेच पहिल्यांदाच जेतेपद आपल्या नावावर केलं होतं. तेव्हाही भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता. सामन्यानंतर हातमिळवणी करताना भारतीय खेळाडूने बांगलादेशी खेळाडूला धक्का दिला होता. तत्पूर्वी त्या खेळाडूने अपशब्द वापरले होते. त्यामुळे वाद रंगला आणि दोन्ही खेळाडू भिडले होते. युवा खेळाडूंच्या अशा वर्तनामुळे दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.