वरुण चक्रवर्तीची वनडे संघात एन्ट्री! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. पण वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची संघात काही निवड झालेली नाही. पण आता त्याच्या नशिबाचं दार खुलं होईल असं दिसत आहे. कारण संघात नसताना वरुण चक्रवर्ती भारतीय संघासोबत नागपूरला पोहोचला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारताने इंग्लंडला टी20 मालिकेत लोळवल्याने इंग्रंजांचं मनोबळ खचलं आहे. त्यामुळे कमबॅक करण्यासाठी त्यांची धडपड असणार आहे. असं असताना इंग्लंड संघाला घाम फुटला आहे. कारण संघाचा भाग नसताना अचानक वरुण चक्रवर्ती टीम इंडियासोबत नागपूरला पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीने टी20 मालिकेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं होतं. पाच सामन्यात 14 विकेट घेत प्लेयर ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता. त्याच्या या खेळीची दखल घेतली असं दिसत आहे. वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची शक्यता यावरून वर्तवण्यात येत आहेत. वरुण चक्रवर्ती टीम इंडियासोबत सराव करत असल्याने काही संकेत मिळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात ऐनवेळी वरुण चक्रवर्तीची संघात एन्ट्री झाली तर आश्चर्य वाटायला नको. वरुण चक्रवर्ती टीम इंडियासह नेट प्रॅक्टिस करताना दिसला. नागपूरच्या प्रॅक्टिस पिचवर केएल राहुलला गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची नजर होती.
वरुण चक्रवर्तीने अद्याप वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केलेलं नाही. पण त्याने टी20 मालिकेत केलेली कामगिरी नाकारता येणार नाही. वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा सध्या तरी भाग नाही. पण लवकरच त्याचा समावेश संघात होऊ शकतो अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. विजय हजारे ट्रॉफीतही वरुण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली होती. वरुण चक्रवर्तीने तामिळनाडूसाठी एकूण 6 सामने खेळले आणि 18 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 5 रन प्रतिओव्हर होता. इतकंच काय दोन वेळा पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला. लिस्ट ए 23 सामन्यात वरुण चक्रवर्तीने 59 विकेट घेतल्या.
He is now bowling… https://t.co/3NWEmaVRKo pic.twitter.com/fnJBD5Lp2Q
— Sandipan Banerjee (@im_sandipan) February 4, 2025
Varun CV is in Nagpur, training with the Indian ODI team. He is yet to be officially added to the squad though…#indvseng pic.twitter.com/69LOaXvLHe
— Sandipan Banerjee (@im_sandipan) February 4, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.