AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरने शेवटी उतरून मिळवून दिला विजय, संघ अडचणीत असताना 20 चेंडूतच केली तोडफोड

विजय हजारे 2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना रंगला. या सामन्यात हैदराबादने विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान गाठताना केलेले प्रयोग मुंबईच्या अंगलट आले होते. पण कर्णधार श्रेयस अय्यर शेवटी उतरून संघाला विजय मिळवून दिला.

श्रेयस अय्यरने शेवटी उतरून मिळवून दिला विजय, संघ अडचणीत असताना 20 चेंडूतच केली तोडफोड
| Updated on: Dec 23, 2024 | 5:18 PM
Share

विजय हजारे 2025 स्पर्धेत मुंबई संघाने कमबॅक केलं आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकचं आव्हान होतं. अशा स्थितीत मुंबईने दुसऱ्या सामन्यात केलेले प्रयोग अंगलट आल्याचं दिसलं. पण श्रेयस अय्यरने नवव्या स्थानावर उतरून संघाला संकटातून बाहेर काढलं. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात हैदराबादने सर्व गडी गमवून 169 धावा केल्या. हैदराबादचा संपूर्ण संघ 38.1 षटकच खेळू शकला. इतक्या कमी धावा विजयासाठी असल्याने मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रयोग केले. पण हे प्रयोग करताना सामन्याची पकड सैल होताना दिसत होती. मुंबईच्या चाहत्यांची धाकधूकही वाढली होती. पण श्रेयस अय्यरने नवव्या स्थानावर उतरत निराश केलं नाही.

अंगकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रे 28 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर संघाची गाडी रूळावरून घसरली. हार्दिक तामोरेला आपल्ं खातंही खोलता आलं नाही आणि आला तसाच तंबूत गेला. अंगकृष रघुवंशीही मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. अवघ्या 19 धावा करत त्याचा डाव संपुष्टात आला. सूर्यांश शेडगे 6, अथर्व अंकोलकर 5, शार्दुल ठाकुर 0 धावांवर बाद झाले. त्यामुळे संघाची स्थिती 6 गडी बाद 67 झाली.सातवी विकेट सूर्यकुमार यादवची गेली. 18 धावा करून बाद झाला आणि संघ अडचणीत आला. अशा स्थिती श्रेयस अय्यर मैदानात उतरला.

श्रेयस अय्यर उतरला तेव्हा संघाला विजयासाठी 62 धावांची आवश्यकता होती. अशा स्थितीत त्याने आक्रमक खेळी करत संघाला सावरलं. 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. त्याला तनुष कोटीयनची उत्तम साथ लाभली. एका बाजूने त्याने चांगला लढा दिला. त्याने 37 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): तन्मय अग्रवाल, अभिरथ रेड्डी, टिळक वर्मा (कर्मदार), एल्गानी वरुण गौड, रोहित रायडू, अरावेली अवनीश (विकेटकीपर), तनय त्यागराजन, चामा व्ही मिलिंद, अजय देव गौड, मोहम्मद मुद्दसिर, सरनू निशांत.

मुंबई (प्लेइंग इलेव्हन): अंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, एम जुनेद खान

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.