IND vs BAN | बांगलादेशविरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीची ‘बेबी ओव्हर’, व्हिडीओ तुफान व्हायरल!
Virat Kohli Bowling againsta Bangladesh : भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने बॉलिंग केली आहे. विराटने तब्बल सहा वर्षांनी बॉलिंग केली हा व्हिडीओ सोशल मीडियालवर व्हायरल झाला आहे.

पुणे : वर्ल्ड कपमधील भारत आणि बांगलादेशविरूद्धचा सामना सुरू असून पुणेकरांच्या तिकिटाचे पैसे फिटले म्हणावं लागेल. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने अनेक विक्रम रचलेले सर्वांनी पाहिलेत. मात्र कोहलीला वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करताना पुणेकरांनी पाहिली. कोहलीने सामन्यातील नवव्या ओव्हरमधील तीन चेंडू टाकत ओव्हर पूर्ण केले. कोहलीने 2017 मध्ये शेवटची बॉलिंग केली होती, त्यानंतर आज पुण्याच्या गहुंजेमध्ये कोहलीने आज बॉलिंग केली. कोहलीचा बॉलिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटला का टाकावी लागली ओव्हर?
सामन्याच्या 9 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी आला होता. पहिला चेंडू निर्धाव गेला त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवर दोन चौकार आले, यामधील दुसरा चौकार अडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्याने केला. यादरम्यान हार्दिक पंड्याच्या टाचेला दुखापत झाली होती, पंड्या काहीवेळ मैदानात थांबला त्याने मैदानात थोडावेळ घेतला. परंतु त्याला बॉलिंग करता आली नाही आली अन् मैदान सोडावं लागलं.
हार्दिक बाहेर गेला त्यानंतर त्याची राहिलेली ओव्हर विराट कोहली याने पूर्ण केली, पहिला चेंडू डॉट केला त्यानंतरच्या दोन्ही चेंडूंवर एक एक धावा गेली. विराटला बॉलिंग करताना पाहून चाहते पंड्या बाहेर गेला हे विसरूनच गेले.
पाहा व्हिडीओ-
Virat Kohli bowling highlights#INDvsBANpic.twitter.com/dUrKhJTydg
— ` (@KohliKlassic) October 19, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम
