AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटू मित्राच्या मृत्यूनंतर विराट कोहलीला बसला धक्का, आयपीएल स्पर्धेदरम्यान ट्वीट करत म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. वयाच्या 36व्या वर्षी निधन झाल्याने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दु;खद बातमीनंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्रिकेटपटू मित्राच्या मृत्यूनंतर विराट कोहलीला बसला धक्का, आयपीएल स्पर्धेदरम्यान ट्वीट करत म्हणाला..
क्रिकेटपटू मित्राच्या मृत्यूनंतर विराट कोहलीला बसला धक्का, आयपीएल स्पर्धेदरम्यान ट्वीट करत म्हणाला..Image Credit source: PTI
| Updated on: May 07, 2026 | 4:50 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान 36 वर्षीय क्रिकेटपटू अमनप्रीत गिलची मृत्यूची बातमी समोर आहे. अनेकांना तर या बातमीवर विश्वास बसेना. कारण अवघ्या 36व्या वर्षी क्रिकेटपटूने या जगाचा अचानक निरोप घेतला. अमनप्रीत गिल या क्रिकेटपटूची वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी प्राणज्योत मालवली. या दु:खद बातमीनंतर दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीला धक्का बसला आहे. अमनप्रीत गिलने 6 मे 2026 रोजी चंदीगड येथे अखेरचा श्वास घेतला. अंडर 19 क्रिकेटमध्ये विराट कोहली त्याच्यासोबत खेळला आहे. त्यानंतर अमनप्रीत गिल पंजाबसाठी खेळला. त्याला आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबकडून (पंजाब किंग्स) खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे सोबत खेळलेल्या खेळाडूने जगाचा निरोप घेतल्याने विराट कोहलीला वाईट वाटलं. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच दिवंगत अमनप्रीत गिलला श्रद्धांजली वाहिली.

विराट कोहलीने अमनप्रीत गिलच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत लिहिली की, ‘अमनप्रीत गिलच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. त्याचे कुटुंबिय आणि प्रियजनांना हे दु;ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.’ युवराज सिंगनेही गिलच्या आठवणीत एक भावनिक संदेश शेअर केला. युवराज सिंग म्हणाला की, अमनप्रीत एक मेहनती क्रिकेटपटू होता आणि त्याला खेळाची प्रचंड आवड होती. ड्रेसिंग रूममध्ये घालवलेले क्षण तो नेहमीच लक्षात ठेवेल.’

अमनप्रीत गिल यांचा मृत्यू कसा झाला?

अमनप्रीत गिलचा बऱ्याच काळापासून आजारी असल्याचं सांगितलं जात आहे. सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण डॉक्टरांना त्याच्या आजाराचे निदान करता आले नाही. बुधवारी दुपारी 4 वाजता चंदीगडमधील मणिमाजरा स्मशानभूमीत अमनप्रीत गिल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पंजाब क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान अमनप्रीतला श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?