ICC Test Ranking: विराट कोहली टेस्ट रँकिंगच्या टॉप 10 मधून बाहेर, 2053 दिवसांनी झाली अशी दुर्दशा

ICC Test Ranking: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागच्या अडीच वर्षापासून एकही शतक झळकवू शकलेला नाही. त्यात आता विराटला आणखी एक झटका बसला आहे.

ICC Test Ranking: विराट कोहली टेस्ट रँकिंगच्या टॉप 10 मधून बाहेर, 2053 दिवसांनी झाली अशी दुर्दशा
virat-kohli
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:04 PM

मुंबई: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागच्या अडीच वर्षापासून एकही शतक झळकवू शकलेला नाही. त्यात आता विराटला आणखी एक झटका बसला आहे. विराट कोहली कसोटी क्रमवारीत (Test Ranking) टॉप 10 मधून बाहेर गेला आहे. बुधवारी जारी झालेल्या नव्या टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहलीची 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे. विराट कोहली एजबॅस्टन कसोटीआधी (Edgebaston Test) 10 व्या स्थानावर होता. पण खराब प्रदर्शनामुळे त्याच्या क्रमवारीत आणखी तीन स्थानांची घसरण झाली आहे. विराट कोहली मागच्या 6 वर्षापासून टॉप 10 मध्ये होता. पण आता 2053 दिवसांनी तो टॉप 10 मधून बाहेर गेला आहे.

विराटने दोन वर्षात किती धावा केल्या?

विराट कोहलीचं खराब प्रदर्शन हेच टॉप 10 मधून बाहेर होण्याचं एक कारण आहे. विराट कोहलीला मागच्या दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली मागच्या दोन वर्षात 16 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 29.78 च्या सरासरीने 834 धावा केल्या आहेत. या दरम्यान विराटने एकही शतक झळकावलेलं नाही. विराटने फक्त 6 अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान 4 वेळा तो शुन्यावर आऊट झालाय.

विराट OUT, जॉनी बेयरस्टो IN

इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुट पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्याकडे 900 पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन दुसऱ्यास्थानावर आहे. त्याचे 879 रेटिंग पॉइंट्स आहेत. स्टीव स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आजम चौथ्या स्थानावर आहे. ऋषभ पंत कसोटी क्रमवारीत पाचव्या नंबरवर पोहोचला आहे. रोहित शर्मा 9 व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोने टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. तो 10 व्या स्थानावर आहे. काल भारताविरुद्ध त्याने शानदार शतकी खेळी केली होती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.