कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताच विराट कोहलीचं इतक्या कोटींचं नुकसान! जाणून घ्या
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वत्र या निर्णयाची चर्चा रंगली आहे. तसं पाहीलं तर विराट कोहली आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. मात्र त्याने कसोटी क्रिकेट यापुढे न खेळण्याचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिला आहे.

न्यूझीलंडकडून मायदेशी आणि ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत मात दिल्यानंतर भारताचं तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. आता भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत 14 वर्षांच्या कसोटी क्रिकेटला ब्रेक लावला आहे. विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातीला शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. हा दौरा विराट कोहलीसाठी काही खास गेला नाही. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत फक्त एक शतक ठोकलं. त्यामुळे त्याच्या खेळीवर टीका झाली होती. अखेर विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयामुळे विराट कोहलीचं मोठं नुकसान होणार आहे.
विराट कोहलीचं कोट्यवधींचं नुकसान
टीम इंडिया या वर्षी एकूण 9 कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआय एक कसोटी सामन्यासाठी मानधन म्हणून 15 लाख रुपये देते. जर विराट कोहली कसोटीतून निवृत्त झाला नसता तर त्याला कसोटी फॉर्मेटसाठी 1 कोटी 35 लाख रुपये मिळाले असते. टीम इंडिया सर्वप्रथम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. तसेच 4 ऑगस्टला शेवटचा कसोटी सामना आहे. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात होम ग्राउंडवर वेस्ट इंडिजशी दोन सामन्यांची कसोटी मालिका, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. म्हणजेत या तीन मालिकेत 9 कसोटी सामने खेळणार आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द
विराट कोहीलने 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 123 सामने खेळला. यात त्याने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. यात 31 अर्धशतक आणि 30 शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे यापैकी 40 सामन्यात त्याच्या नेतृत्वात विजय मिळाला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने 17 कसोटी सामने गमावले आणि 11 सामने ड्रॉ झाले आहेत.