वनडे मालिकेनंतर वॉशिंग्टन सुंदर टी20 वर्ल्डकपमधून आऊट? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे वनडे मालिकेला मुकला आहे. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने याबाबतचे अपडेट दिले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत जेतेपद कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. पण टीम इंडियाला या स्पर्धेपूर्वी दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तिलक वर्मावर तातडीची सर्जरी करावी लागली होती. आता अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला आहे. पण टेन्शन मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आहे. कारण या स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाला धक्का बसला. जर जिथपर्यंत वॉशिंग्टन सुंदर फिट अँड फाईन झाला नाही तर त्याला टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून वगळलं जाऊ शकतं. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. आता या मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. बीसीसीआयने अधिकृत माहिती देताना स्पष्ट म्हंटलं आहे की, ‘रविवारी वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला खालच्या बरगडीला वेदना जाणवू लागल्या. लवकरच त्याचे स्कॅन केलं जाणार आहे. त्यानंतर बीसीसीआय वैद्यकीय टीम तज्ज्ञांचा सल्ला घेईल.’ बीबीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट म्हंटलं आहे की वैद्यकीय पथक दुखापतीचं मूल्यांकन करत राहील. स्कॅनमध्ये काही गंभीर आढळलं तर 2026 च्या टी20 वर्ल्डकप संघातून वगळलं जाऊ शकते.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर ऐवजी आयुष बदोनीला वनडे संघात स्थान दिलं आहे. वॉशिंग्टन सुंदरची दुखापत गंभीर असेल तर टी20 वर्ल्डकप संघात त्याची जागा कोण घेईल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूची वर्णी लागू शकते. कदाचित आयुष बदोनीचा विचार केला जाऊ शकतो. पण त्यासाठी त्याला उर्वरित दोन वनडे सामन्यात संधी मिळाली तर चांगली कामगिरी करावी लागली. त्याने चांगली कामगिरी केली तर कदाचित त्याची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तिलक वर्माबाबत जर तरचं गणित आहे. फिट अँड फाईन झाला नाही तर आणखी एक जागा रिक्त होईल.
