तो सामना गमवावा इतके आम्ही लेचेपेचे नव्हतो; रवी शास्त्रींनी व्यक्त केली खंत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. सात वर्षे ते टीम इंडियाचे (Team India) संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहिले.

तो सामना गमवावा इतके आम्ही लेचेपेचे नव्हतो; रवी शास्त्रींनी व्यक्त केली खंत
Ravi shastri
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 12:36 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. सात वर्षे ते टीम इंडियाचे (Team India) संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहिले. यादरम्यान टीम इंडियाला खूप यश मिळालं. भारतीय संघ नंबर वन बनला. ऑस्ट्रेलियात दोनदा कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. पण रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. सलग पाच वर्ष नंबर एकचा कसोटी संघ आणि अनेक ICC स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठणे ही त्यांच्या काळातली भारतीय संघाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. या काळात त्यांनी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि भारतीय क्रिकेटचा दर्जा उंचावला. त्यामुळे शास्त्री हे भारतातील प्रदीर्घ काळातील सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत, असा एक भक्कम युक्तिवाद कोणीही मांडू शकतो.

मधल्या काळात आयसीसी ट्रॉफी जिंकता न आल्याने निराशा झाली. टीम इंडिया 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचली, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला आणि टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या सुपर-12 स्टेजमधून संघ बाहेर पडला. आपल्या संघाला जगातील सर्वोत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रशिक्षकासाठी ही दुखावणारी बाब होती. कोणत्या अपयशाने तुम्हाला सर्वाधिक दुःख झाले? याबद्दल रवी शास्त्री यांना विचारले असता, शास्त्री यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.

“माझ्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत होणे ही माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी निराशा होती, कारण तो सामना गमवावा इतके आम्ही लेचेपेचे नव्हतो. आम्ही तो कमीत कमी ड्रॉ करायला हवा होता. कारण आम्ही पाच वर्षे ज्या प्रकारचे क्रिकेट खेळलो होतो, त्यामुळे ते होऊ शकले असते. पाच वर्ष एकच संघ जागतिक क्रिकेटमध्ये नंबर वन असणे हा काही विनोद नाही. आणि हाच संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत होतो हे खूप क्लेशदायक होतं. ‘Bold and Brave: Ravi Shastri Way’ या स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्मात शास्त्री बोलत होते.

याआधीदेखील शास्त्रींनी खंत व्यक्त केली

याआधीदेखील शास्त्री यांनी याबाबत खंत व्यक्त केली होती. न्यू इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या एका संभाषणात रवी शास्त्री म्हणाले होते की, ‘मी म्हणेन की हा संघ माझ्या कार्यकाळात दोन आयसीसी विजेतेपद जिंकण्यास पात्र होता. हे मी प्रत्येक वेळी सांगेन. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फैसला केवळ एका सामन्याने झाला, हे मला पटलं नाही. मला नेहमी वाटते की, हा निर्णय योग्य नाही कारण पाच वर्षे संघ पहिल्या क्रमांकावर होता. माझ्यासाठी ही सर्वात मोठी निराशा होती कारण आम्ही आयसीसी ट्रॉफी मिळवण्यासाठी सामनाही ड्रॉदेखील करु शकलो नाही. 2019 च्या विश्वचषकात आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलो. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असल्याने वातावरण पूर्णपणे बदलले होते.

इतर बातम्या

IND vs SA: शतक हुकलं तरी कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रम, गांगुली, धोनी, रणतुंगाला मागे टाकलं

IND vs SA: कोहलीचा झुंजार खेळ पण दक्षिण आफ्रिकेने भारताला 223 धावांवर रोखलं

Virat Kohli: well-done कॅप्टन! आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर दिसला ‘विराट’ निर्धार

(We didn’t deserve to lose that game: Ravi Shastri Expressed his disappointment about india lost WTC final 2021)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.