AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026: भारत-बांग्लादेश सेमीफायनल रद्द झाली तर फायनलला कोण? जाणून घ्या काय आहे नियम

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ आपला सेमीफायनल सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणाला फायदा मिळेल? जाणून घ्या सविस्तर

Asian Games 2026: भारत-बांग्लादेश सेमीफायनल रद्द झाली तर फायनलला कोण? जाणून घ्या काय आहे नियम
Asian Games 2026: भारत-बांग्लादेश सेमीफायनल रद्द झाली तर फायनलला कोण? जाणून घ्या काय आहे नियमImage Credit source: PTI
| Updated on: Sep 18, 2026 | 4:51 PM
Share

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या क्रिकेट स्पर्धेत गतविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचला आहे. नागोया येथील कोरोबोगेई स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने यजमान जपानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताचा सामना 20 सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीत बांगलादेशशी होणार आहे. सध्या नागोयामधील हवामान पाहता, जर पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

मॅच रद्द झाली तर कोण पोहोचणार फायनलमध्ये?

स्पर्धेच्या नियमांनुसार, जर भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा बाद फेरीचा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर सामना पूर्णपणे पावसामुळे रद्द झाला आणि डकवर्थ-लुईस नियमासाठी आवश्यक असलेली किमान षटकेसुद्धा खेळता आली नाहीत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उच्च रँकिंग आणि स्पर्धेतील उच्च सीडिंग असलेला संघ विजेता घोषित केला जातो. आंतरराष्ट्रीय टी20 रँकिंग आणि स्पर्धेच्या सीडिंगमध्ये भारतीय महिला संघ बांगलादेशपेक्षा खूप पुढे आहे, त्यामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला याचा पूर्ण लाभ मिळेल.

बांगलादेशला याच नियमामुळे लागली होती लॉटरी

बांगलादेशच्या महिला संघाने याच नियमाचा फायदा घेत उपांत्य फेरी गाठली आहे. गुरुवारी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशचा सामना चीनशी होणार होता, परंतु सततच्या पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्यात आला. परिणामी, आपल्या श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे बांगलादेशने थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.

उपांत्यपूर्व सामन्यात भारताची जपानवर सहज मात

उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत जपानला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जपानच्या संघाने पूर्ण 20 षटके खेळण्याचा प्रयत्न केला, पण धारदार भारतीय गोलंदाजीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. भारताने जपानला 19.5 षटकांत अवघ्या 57 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी अवघ्या 5 षटकांत 2 गडी गमावून 58 धावांचे सोपे लक्ष्य सहज पार केले.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं