AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व काही उद्ध्वस्त करावं लागेल..! केकेआर संघात काय घडतंय? वीरेंद्र सेहवागच्या विधानाने रंगली चर्चा

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी सुमार दर्जाची होत आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. संघाची या स्थितीवर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे.

सर्व काही उद्ध्वस्त करावं लागेल..! केकेआर संघात काय घडतंय? वीरेंद्र सेहवागच्या विधानाने रंगली चर्चा
सर्व काही उद्ध्वस्त करून टाकेन..! केकेआर संघात काय घडतंय? वीरेंद्र सेहवागच्या विधानाने रंगली चर्चाImage Credit source: PTI
| Updated on: Apr 15, 2026 | 5:09 PM
Share

Virender Sehwag on Kolkata Knight Riders: आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका सुरूच आहे. एका पाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसत आहेत. काही सामने तर हातातून घालवले आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात तर सोपं लक्ष्य होतं. पण या सामन्यातही 32 धावांनी पराभव झाला. त्यामुळे केकेआर संघावर टीकेची झोड उठली आहे. केकेआरच्या सुमार कामगिरीवर आता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील टीका केली आहे. सेहवागने या पराभवाचं विश्लेषण करताना स्पष्ट केलं की, त्यांची रणनिती आणि फलंदाजीची पद्धत समजण्यापलीकडे आहे. वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना केकेआरच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वीरेंद्र सेहवागच्या मते, संघाची स्थिती अशीच राहिली तर संघात येत्या काही दिवसात मोठे बदल होऊ शकतात.

वीरेंद्र सेहवाग केकेआरबाबत म्हणाला की, ‘कोचिंग स्टाफ काय करत आहे, ते काय विश्लेषण करत आहेत, हे मला समजत नाही. जर तुम्हाला माहित आहे की तुम्ही चुका करत आहात, तर तुम्ही त्या का सुधारत नाही? तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा का करत आहात? अशा परिस्थितीत, मला वाटते की एक वेळ अशी येईल जेव्हा घरातील सर्व बल्ब बदलावे लागतील. याचा अर्थ असा की, सगळं काही उद्ध्वस्त करावं लागेल.’

वीरेंद्र सेहवाने पुढे विश्लेषण करताना सांगितलं की, ‘जर एक किंवा दोन सामन्यात पराभव होईल. तेव्हा तुम्ही पाहाल की न्यूझीलंडच्या दोन ओपनरसह खेळताना दिसतील. कॅमरून ग्रीन बेंचवर बसलेला असेल. कदाचित अजिंक्य रहाणेला खेळणार नाही. त्याच्या कोमी दुसरा येईल आणि कर्णधार होईल. रिंकुला बाहेर बसवलं जाईल. हे सर्व होऊ शकतं. कारण तसं पण पराभूत होत आहोत. तर त्यात बदल करण्याचा प्रयत्न असेल.’

कोलकात्याची प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आता लांबत चालली आहे. सध्या 1 गुणासह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे आता उर्वरित 9 पैकी 7 सामने जिंकणं भाग आहे. सध्याची संघाची स्थिती पाहता ते शक्य वाटत नाही. केकेआरचा पुढचा सामना 17 एप्रिलला गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यासाठी संघात नक्कीच बदल असतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...