AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd ODI: भारत ऑस्ट्रेलिया सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून संभाव्य प्लेइंग 11

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकणं भाग आहे. दुसऱ्या वनडे सामना कुठे, कधी आणि प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते? याबाबत जाणून घेऊयात.

IND vs AUS 2nd ODI: भारत ऑस्ट्रेलिया सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून संभाव्य प्लेइंग 11
IND vs AUS 2nd ODI: भारत ऑस्ट्रेलिया सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून संभाव्य प्लेइंग 11Image Credit source: PTI
| Updated on: Oct 22, 2025 | 4:11 PM
Share

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारताने हा सामना गमावला तर मालिकाही गमावेल. त्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबर रोजी एडलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी उसळी आणि फलंदाजीसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दोघेही पहिल्या सामन्यात फेल गेले होते. विराट कोहलीला तर खातंही खोलता आलं नव्हतं. पण दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून चांगला कामगिरीची अपेक्षा आहे. तर वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 159 वनडे सामने झाले आहे. यात ऑस्ट्रेलियाचं पारडं भारतापेक्षा जड असल्याचं दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियाने 85 सामन्यात भारताला पराभवाची धूळ चारली आहे. तर भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने बरोबरीत किंवा निकालाविना संपले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी खेळला जाईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचा टॉस किती वाजता होईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार सकाळी 8:300 वाजता होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचा पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता खेळवला जाणार आहे.

भारतातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या टीव्ही चॅनेलवर केले जाईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील जिओहॉटस्टार एप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11

भारत प्लेइंग 11: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन, जोश हेझलवुड

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.