RCB vs RR : राजस्थान रॉयल्सने सामना कुठे गमावला? कर्णधार संजू सॅमसनने सांगितलं खरं कारण
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आरसीबीने 9 गडी राखून राजस्थानचा पराभव केला. या पराभवामुळे राजस्थानचा पाय आणखी खोलात गेला आहे. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने काय झालं ते सांगितलं.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जबरदस्त कामगिरी केली. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीचं दर्शन घडवलं. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना 20 षटकात 173 धावांवर रोखलं. खरं तर 174 ही धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी सहज सोपी होती. झालंही तसंच.. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 17.3 षटाकत 1 गडी गमवून धावा पूर्ण केल्या. या विजयासह आरसीबीचा संघ पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यातील पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू म्हणाला की, ‘अशा संथ खेळपट्टीवर नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या 10 षटकांसाठी उन्हात प्रथम फलंदाजी करणे दिवसाच्या सामन्यात कठीण असते. आम्हाला माहित होते की ते आम्हाला पुरेपूर दाबण्याचा प्रयत्न करतील आणि मला वाटते की त्यांनी पॉवरप्लेमध्ये सामना जिंकला. झेल सामने जिंकतात. त्यांनी आमचे झेल देखील सोडले आणि आम्ही त्यांचे झेल देखील सोडले. निःसंशयपणे आम्हाला सुधारणा करावी लागेल. विजयाचे श्रेयस आरसीबीला जातं. दुसऱ्या डावात चेंडू बॅटवर चांगला आला.सुधारणा आणि मजबूत पुनरागमन आमच्यात चर्चा होत आहेत. आम्हाला विचार मागे सोडून पुढील सामन्यासाठी सकारात्मक परत यावे लागेल.’
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने सांगितलं की, ‘ गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या योजना राबवल्या, ते पाहून छान वाटले. पॉवरप्लेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते खरोखरच खास होते. विकेट फलंदाजीसाठी सोपी नव्हती. आम्ही 150-170 चे लक्ष्य ठेवले होते. मला माझ्या गोलंदाजांकडून आत्मविश्वास मिळतो. ते कोणत्याही पृष्ठभागावर आणि कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करण्यास तयार आहेत, हे आश्चर्यकारक आहे आणि मला खूप आत्मविश्वास देते. डग-आउटमधून मला सॉल्टची फलंदाजी खूप आवडली. तो ज्या पद्धतीने स्ट्राइक करत होता आणि त्याच वेळी विराट कोहली स्ट्राइक रोटेट करत होता, ते खरोखरच खास होते. आम्ही नेहमीच सकारात्मक आणि चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल.
