तो पत्रकार कुठंय? भारताला डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माध्यम प्रतिनिधिचा कॅप्टन शुबमनकडून कार्यक्रम, परत नादीच लागणार नाही, Video
Wheres My Favourite Journalist? Shubman Gill Press Conference : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला आकडेवारीवरुन डिवचणाऱ्या इंग्लंडच्या पत्रकाराची कर्णधार शुबमन गिल याने विजयानंतर फिरकी घेतली. पाहा व्हीडिओ

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात रविवारी 6 जुलैला धमाकेदार विजय मिळवला. भारताने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत इंग्लंडवर मात केली. भारताने एजबेस्टनमध्ये 1967 साली पहिला सामना खेळला होता. तेव्हापासून भारताला या मैदानात खेळलेल्या एकूण 8 पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताने या मैदानातील नवव्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आणि एजबेस्टनमध्ये पहिलावहिला विजय साकारला. भारताने इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार शुबमन गिल याने या विजयानंतर एजबेस्टनमधील कामगिरीवरुन भारताला डिवचणाऱ्या पत्रकाराची फिरकी घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.
भारत इथे कधी जिंकू शकला नाही, असं इंग्लंडच्या एका पत्रकाराने दुसऱ्या कसोटी सामन्याआधी शुबमन गिल याला मस्करीत म्हटलं होतं. तेव्हा शुबमनने इथे आधी काय झालं? याबाबत मला माहित नाही. आता जो भारतीय संघ आहे तो सर्वोत्तम आहे, असं शुबमनने म्हटलं होतं
शुबमनने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर पत्रकाराने विचारलेल्या त्या प्रश्नाची आठवण करुन दिली. शुबमनने विजयानंतर पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या त्या पत्रकाराची आठवण काढली. शुबमन नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
“मी माझ्या आवडत्या पत्रकाराला पाहू शकत नाही. तो पत्रकार कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे. मी आकडेवारीत विश्वास ठेवत नाही, हे सामन्याआधीही म्हटलं होतं. एजबेस्टनमध्ये 50-60 वर्षांत अनेक भारतीय संघ आले आहेत. आमच्याकडे त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे. जर आम्ही योग्य निर्णय घेत राहिलो तर ही मालिका सर्वांच्या लक्षात राहिल”, असं शुबमनने म्हटलं.
शुबमनकडून त्या पत्रकाराची अशी फिरकी
A SAVAGE MOMENT BY CAPTAIN SHUBMAN GILL: [Ankan Kar]
“I can’t see my favourite Journalist, Where is he?”. 😂🔥 pic.twitter.com/NbqlQaN2rQ
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2025
भारताने असा जिंकला सामना
भारताने एजबेस्टनमध्ये इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 271 धावांवर ऑलआऊट केलं. भारतासाठी आकाश दीप याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर इतर 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्याआधी शुबमन गिल याने दोन्ही डावात धमाका केला. शुबमनने पहिल्या डावात द्विशतक केलं. तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं. शुबमनने पहिल्या डावात 269 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात कर्णधार गिलने 161 धावा केल्या.
