AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्मा खेळणार का?, मुंबईच्या खेळाडूने दिली माहिती, म्हणाला…

आयपीएल स्पर्धेचे सर्वाधिक खिताब असणाऱ्या मुंबई संघाची दुसऱ्या पर्वाची सुरुवात खास झालेली नाही. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने त्यांना पहिल्याच सामन्यात पराभूत केले आहे.

IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्मा खेळणार का?, मुंबईच्या खेळाडूने दिली माहिती, म्हणाला...
रोहित शर्मा
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 6:49 PM
Share

IPL 2021: जगातील अव्वल क्रमाकांची क्रिकेट लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) भिडणार आहे. आयपीएल स्पर्धेचे सर्वाधिक खिताब असणाऱ्या मुंबई संघासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीलाच त्यांना पराभव पत्करावा लागल्याने. ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी फेकले गेले आहेत. दरम्यान आजच्या सामन्याचा विचार करता सर्वात महत्त्वाचीा गोष्ट म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा खेळण्यासाठी उपलब्ध असणार का? ही आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहितच्या नसण्याने संघाला तोटा झाला होता. त्यामुळे आज त्याचे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दरम्यान रोहितसह हार्दीक पंड्याही (Hardik Pandya) आज खेळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न असून यासंबधी माहिती मुंबईचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने (Trent Bolt) दिली आहे. बोल्ट म्हणाला, ”रोहित आणि हार्दीक हे दोघेही फिटनेसच्या कारणामुळे पहिला सामना खेळले नव्हते. त्यांना कोणतीही मोठी दुखापत नसली तरी त्यांनी विश्रांती घेणे गरजेचे आहे. दोघेही संघाचे महत्त्वाचे खेळाडू असल्याने भविष्यातील सामन्यांत त्यांची फार गरज लागणार आहे. येत्या काही दिवसांत ते फिट होतील अशी आशा आहे.” दरम्यान बोल्टच्या या बोलण्यावरुन आजच्या सामन्यातही रोहित आणि हार्दीक विश्रांती घेणार असल्याचेच प्रतित होत आहे. तरीदेखील ते खेळणार का? ही नेमकी माहिती नाणेफेकी दरम्यानच मिळेल.

मुंबई विरुद्ध केकेआर Head To Head

आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि केकेआर 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईचा पगडा कमालीचा भारी असून त्यांनी 28 पैकी 22 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केकेआर केवळ 6 वेळाच विजय मिळवू शकली आहे. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध तीनदा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये दोन वेळा मुंबईचाच संघ जिंकला आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्मधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या,  कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

IPL 2021: दिल्लीकडून पराभवानंतर सनरायजर्स हैद्राबाद संघाची ‘मिस्ट्री गर्ल’ पुन्हा चर्चेत, इंटरनेटवर व्हायरल झाले PHOTO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

IPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय

(Will rohit sharma play in playing 11 for MI vs KKR match at IPL 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.